घरमहाराष्ट्रगणेश विसर्जनादरम्यान तळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान तळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Subscribe

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये गणपती विसर्जना दरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेली ४ चिमुकले तळ्यात बुडाले. यामधील एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आले तर ३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गणेश विसर्जना दरम्यान मुंबईमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर जुन्नरमध्ये देखील या विसर्जना दरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या ३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावामध्ये ही घटना घडली आहे. ११ वर्षाच्या सुमित सावकार पाबळे, ११ वर्षाच्या वैभव विलास पाबळे आणि ९ वर्षाच्या गणेश नारायण चक्कर या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कावळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.

कावळ पिंपरी या गावामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास गणपती विसर्जन सुरु होते. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पाच मुलं तळ्यावर गेली होती त्यामधील चार मुलं तळ्यात बुडाली. यामधील एका मुलाला वाचवण्यात यश आले. ८ वर्षाचा ओकांर एकनाथ चक्कर सुखरुप असून त्याच्यावर आवारे हॉस्पीटल आळेफाटा येथे उपचार सुरु आहेत. मात्र इतर तीघे जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. बऱ्याच वेळानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -