घरमुंबईपालिका आक्रमक, ७.२ एकरच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा!

पालिका आक्रमक, ७.२ एकरच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा!

Subscribe

पालिकेच्या 'जी साऊथ' विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या एकूण ७.२ एकर आकाराच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालं होतं. यासंदर्भात पालिकेकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही करत पालिकेने ही बांधकामं करणाऱ्या संबंधितांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या.

गणेश विसर्जनाच्या कामातून मुक्त होताच मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या कारवाईत गणेशोत्सवानंतर पहिला हातोडा दक्षिण मुंबईतल्या सेनापती बापट मार्गावरच्या रघुवंशी मिलमध्ये पडला आहे. पालिकेच्या ‘जी साऊथ’ विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या एकूण ७.२ एकर आकाराच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालं होतं. यासंदर्भात पालिकेकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही करत पालिकेने ही बांधकामं करणाऱ्या संबंधितांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या. बांधकामे हटवण्याचा इशाराही दिला. मात्र, त्यावर उचित पावले उचलण्यात न आल्यामुळे अखेर पालिकेने या बांधकामांवर कारवाई केली.

२० हजार चौरस फुटांचं बांधकाम!

रघुवंशी मिलमधल्या या भूखंडावर दुपारच्या सुमारास पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक पोहोचलं आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. एकूण २० हजार चौरस फुटांवरची ७ अनधिकृत बांधकामं यावेळी पाडण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये मे. लिटील नॅप (मे. पर्सेप्ट अॅडव्हर्टायझिंग लि.), दुर्गावती जयस्वार, ९९ पॅनकेक, मे. एव्हरलास्ट, मे.नातूझी, नातूझी कार्यालय (मे. रेनेसन्स पेंट्स), बाबुलाल बोहरा कार्यालय यांचा समावेश आहे. ही सर्व अनधिकृत बांधकामे १ ते ३ मजल्यांची आहेत.

- Advertisement -


वाचा – दहा दिवसांत १३९४ रिक्षाचालकांवर आरटीओची कारवाई

- Advertisement -

न्यायालयाने फेटाळली होती विनंती

दरम्यान, पालिकेने या अनधिकृत बांधकामांबद्दल संबंधितांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी सदर नोटिशीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कारवाई न करण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने सोमवारी ही विनंती फेटाळल्यानंतर पालिकेने तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या सुनावणीत उच्च न्यायालयात महापालिकेद्वारे वरिष्ठ विधिज्ञ नरेंद्र वालावलकर यांनी महापालिकेची बाजू मांडली.


तुम्हाला हे माहिती आहे का? – तुमच्या हातातली डेअरी मिल्क बनावट असू शकते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -