घरमहाराष्ट्रनागपूरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊसाला सुरुवात

नागपूरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊसाला सुरुवात

Subscribe

वर्धा,गोंदियातही गारपीटीसह अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात उन्हाची चाहूल लागताच पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागानेही येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला आहे. १८ ते २० मार्चदरम्यान नागपूरसह वर्धा आणि गोंदियात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला होता. यात नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरच्या वाडी, दत्तवाडी, हिंगणा, गोंडखैरी परिसरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरींमुळे परिसरात काळोख पसरला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने आधीच नागपूर सह पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यात १८ ते २० मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा प्रभाव असेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अनेक भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतिताशी वेगाने वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हवामान विभागाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

या अवकाळी पावसाचा परिणाम अनेक जिल्ह्यातील हवामानावर जाणवू लागला आहे. आज (गुरुवारी) पुण्याचे वातावरणात १७.९ अं.से हलका गारवा जाणवत होता. तर सकाळी मुंबईचेही तापमान २४.४ अं.से नोंद झाली आहे. या वातावरण बदलाचा परिणाम देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यातही जाणवणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णनंद होशाळीकर यांनी दिली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -