घरमहाराष्ट्रनाशिकस्वातंत्र्यभावना चेतविणारा "तिळभांडेश्वर"

स्वातंत्र्यभावना चेतविणारा “तिळभांडेश्वर”

Subscribe

पूर्वी तिळभांडेश्वराची बोळ इतकी अरुंद होती की, एक व्यक्ती जेमतेम जाऊ शकत असे, असे सांगितले तर त्यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. गल्लीतील तत्कालीन मंडळीतील मामा एकबोटे पहिल्या महायुद्धात आफ्रिकेला जाऊन आलेले. तिळभांडेश्वराच्या सन्मुख त्यांचा वाडा होता. अरूण एकबोटे देना बँकेचे ख्यातप्रिय अधिकारी, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष होते. सुहासिनी एकबोटे क्रीडा जगतातील हे दाम्पत्य येथील रहिवासी आहे. देवीच्या मठालगत (दरी मातोरीचे) जहागीरदार घराणे. शासकीय नोकरीत ब्रिटीश काळात नावाजलेले डेप्युटी कलेक्टर रघुनाथपंत दशपुत्र यांचा वाडा. या परिवारातील दिगंबर शंकर दशपुत्र शेती व्यवसाय व श्री तिळभांडेश्वर पालखीचे व्यवस्थापन करत. रघुनाथ शंकर दशपुत्रे पोलीस दलात कार्यक्षम अधिकारी व गोविंद शंकर दशपुत्रे अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते.

नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडात महाविद्यालयातील एन. सी. सी. प्रमुख, संगीत व रंगकर्मी, तसेच नाशिक शहरात सर्व सांस्कृतिक आदानप्रदान या योजनेअंतर्गत रशिया येथील अभ्यास दौर्‍यासाठी निवड झालेले किंबहुना नाशिकला सांस्कृतिक विद्यापीठ असा जो लौकिक प्राप्त झाला आहे. त्यातील आघाडीचे सांस्कृतिक कार्यकर्ते, आयुर्विमा महामंडळातील निवृत्त अधिकारी होते. अनेक सन्मान गौरवांकित झालेले व ज्यांनी अलीकडेच अथक प्रयत्नपूर्वक आत्मवृत्त लिहून आगळावेगळा उपक्रम यशस्वीपणे राबविला ते वासुदेवराव उपाख्य नाना दशपुत्रे व विद्याथीनीप्रिय शिक्षिका व आपल्या वसंत उत्सव या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रात रसिकमान्य झालेल्या सुलोचना दशपुरे, खया अर्थाने शहराला सांस्कृतिक मेहूण लाभलेले दाम्पत्य याची तिलभांडेश्वर गलीत वास्तव्यास होते, माणसाच्या जीवनात असतात तसेच चढ-उतार देवाच्या व देवळांच्या भाग्यात असतात, ७०-७५ वर्षापूर्वी तिळपाडेबाराला आजच्यापेक्षा अधिक प्रतिष्ठा व मान्यता होती. या तिळभांडेश्वराचे विशेष म्हणजे ही पिंडी दरवषी तिळातिळाने वाढते आहे, अशी आख्यायिका आहे.

- Advertisement -

त्यावेळी रोज व विशेषतः चातुर्मासात तिळभांडेश्वराला ११ किंवा १११ प्रदक्षिणा घालण्याचा नेम होता. सोळा सोमवारचे व्रत करण्याचा प्रघात विशेष होता, ओल्या वरखांनी स्त्री-पुरुष मौन धारण करून देवीच्या ओट्यावर कहाणी भक्तीभावाने ऐकत असत. देवीच्या मठातील उत्सव नवरात्रात साजरा होई, देवीच्या मूर्तीपुढे हंड्या, झुंबरे लावून आरास केली जात असे. गल्लीतील कुटुंबाकडून शिधा गोळा करून सामुदायिकरित्या देवीच्या कुळधानिमित्त प्रसादाचे भोजन होत असे, ब्राह्मण कुटुंबात विद्यार्थ्यांसाठी माधुकरी देण्याची खास तरतूद असे, ताटात भाकरी किंवा पोळी, पातेल्यात आमटी किंवा भाजी ठेवलेली असे. माधुकर्‍याने ओम भवती मिक्षांदेही असे म्हणून त्यातील मोजका भाग घ्यावा, अशी आशा व संकेत होता. जेवढे वाडे तितक्या वाड्यात चौक व विहीर होत्या. या अरुंद बोळात रात्री प्रकाशाची फारशी सोय नव्हती. त्याकाळी सर्व शहरात मिळून फक्त १२ कंदील होते. १८६९-७० मध्ये त्यात सुधारणा झाली. के रोसिनचे १० हजार ३८५ दिवे मुंबई येथून नगरपालिकेने खरेदी केले. नगरपालिकेने या कामी चार नोकर नेमले, तेव्हा येथे प्रथम दिवा प्रकाशला. १९२६-२७ मध्ये शहरात पेट्रोमॅक्स दिवे आले. अशा या वातावरणात या तिळभांडेश्वर बोळातील अंधाराला उजळून टाकणार्‍या प्रकाशमयी संस्था व व्यक्ती यांचा नामनिर्देश आवश्यक ठरतो. तिळभांडेश्वर व देवीच्या मठाप्रमाणे याठिकाणी प्रसिद्ध असलेले मंदिर म्हणजे दातारांचे विष्णू मंदिर, या नारायणासोबत लक्ष्मी नव्हती. मात्र सरस्वतीची असीम कृपा होती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिलभांडेश्वराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यात दातार परिवाराचे महत्त्वाचे योगदान आहे. दातार व सावरकर दोन्ही घराणे कोकणातील केशवशास्त्री दातारांच्या रामचंद्र व वामन या मुलांच्या कर्तृत्वातून हे घराणे अधिक कृतकृत्य झाले. दातारांच्या वाड्यालगत असलेल्या वर्तकांच्या वाड्यात १८९८ मध्ये बाबाराव व तात्याराव सावरकर हे भगूर येथून नाशिकमध्ये शिक्षणासाठी आले. रामचंद दातार व बाबाराव एकाच वर्गात, तर वामन दातार व तात्याराव हे समवयस्क. दोघांचा जन्म १८८३ चा. त्यामुळे ऋणानुबंध व मैत्री जमली. दातार घराण्याच्या पूर्वीच्या दोन पिढ्या संस्कृत विद्याव्यासंगी. त्यामुळे वामनरावांना संस्कृत शिकविले. इंग्रजी तर राहोच, मराठीही ठीक शिकले नव्हते. शिक्षणाची हेळसांड झाली. परंतु, तात्याराव सावरकरांनी आपल्या धाकट्या भावाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केले. मराठीसंबंधी आवड निर्माण केली. विद्यासंपादन व आपला चरितार्थ चालविण्याचा त्यांना धडा दिला. त्यामुळे वामनराव हे तात्याराव सावरकरांचे एकनिष्ठ भक्त आणि कर्तृत्ववान सहकारी झाले. हे दोन्ही परिवार पुढे एकत्र राहू लागले.

- Advertisement -

‘फुलांची परडी’ हा छोटा काव्यसंग्रह सावरकरांनी ’विजनवासी’ या नावाने लिहिला. त्यातील अर्पण पत्रिकेत मित्रवर्य वामनराव दातार याला नजर असे लिहिलेले वाक्य यात मैत्रभावांचा पुरावा देण्यास पुरेसे आहे. बालपणी आईवडिलांचे निधन, चुलता-चुलतीनंतर वडील बंधूने त्यांचा सांभाळ केला. घरीच संस्कृत व ब्रह्मकर्म शिकले. परंतु, सावकारांनी चमत्कार घडविला. वामनशास्त्री दातार यांनी संस्कृत नाटकांचा अभ्यास केला. सावरकरांचे मित्रमेळा अभिनव भारताचे सदस्य झाले. गाजलेल्या वंदे मातरम् खटल्यात दंडाची शिक्षा भोगली. एका वर्षात वैद्यकीय शास्त्राच्या तीन परीक्षा देण्याच्या विक्रमी यशानंतर वैद्य भूषण पदवी मिळविली. नाटकाचे गाढे व्यासंगी. ते नाशिक नगरपालिकेचे सभासद म्हणून निवडून आले. होमरूल प्रांतिक परिषद, असहकार चळवळीत भाग घेतला. अनेक वैद्यकीय परिषदेत महत्त्वाचा सहभाग, संशोधन, प्रकाशन व लेखन केले

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -