घरमहाराष्ट्रप्रवाशांच्या आरोग्याशी रेल्वेचा खेळ; रेल्वे स्टॉलवरच्या सॅन्डविचमध्ये अळ्या

प्रवाशांच्या आरोग्याशी रेल्वेचा खेळ; रेल्वे स्टॉलवरच्या सॅन्डविचमध्ये अळ्या

Subscribe

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र या तक्रारी अद्यापही कसलीच कारवाई नाही

रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांवरील मिळाणाऱ्या खाद्यपदार्थात झुरळ सापडणे सारखे प्रकार यापूर्वी समोर आले आहे. मात्र आता चक्क रेल्वे स्थानकांवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवरच्या सॅन्डविचमध्ये अळ्या आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र या तक्रारी अद्यापही कसलीच कारवाई केले गेली नाही.

असा उघड झाला प्रकार

ही घटना १३ नोव्हेंबर २०१९ च्या पुणे रेल्वे स्थानकांवरची आहे. प्रवासी तुषार देशमुख हे त्यांच्या कुटूंबियांना रेल्वे स्थानकावर सोडविण्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी प्लॅटफॉर्मवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर २५ रुपयांचे एक सॅन्डविच विकत घेतले. मात्र जेव्हा तो हे सॅन्डविच खात असताना सॅन्डविचमध्ये अळ्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुन्हा एकादा सॅन्डविच पूर्णपणे उघडून बघतिलयावर तुषारला सॅन्डविचमध्ये एक अळी दिसून आली. तेव्हा त्यांनी यांच्या मोबाईल द्वारे व्हिडिओ तयार केला.

सॅन्डविचमध्ये अळी आढळ्यानंतर मी यांची तक्रार रेल्वेकडे केली होती. मात्र येवढ्या दिवस उलटून सुद्धा रेल्वे कारवाई करत नाही. रेल्वेनी प्रवाशांना आरोग्याशी खेळ खेळणे थांबवावे. – तुषार देशमुख, प्रवासी

- Advertisement -

सोबतच याबाबत रेल्वेच्या खाद्यपदार्थ स्टॉलवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. तेव्हा कर्मचारी म्हणाले की, टमाटर मध्ये आली असेल. तुम्हाला दुसरे सॅन्डविच देतो. आम्ही हे सॅन्डविच या ठिकाणी तयार करत नाही. ते दुसरीकडून आणले जाते. असे सांगून आपली जबाबदारी खाद्यपदार्थ स्टॉलधारकाने झटकली. मात्र तुषार शांत बसला नाही तर त्यांनी यासंबंधित लेखी तक्रार रेल्वे विभागाकडे करण्यात आली आहे. सोबतच या संबंधित कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांना केली आहे. मात्र गेल्या १४ दिवसापासून रेल्वेने अद्यापही कारवाई केली नाही. त्यामुळे तुषारने यासंबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत आपली नाराजी व्यक्त केली आहेत.

प्रवाशांच्या आरोग्यशी रेल्वेचा खेळ

रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यात मिळणारे खाद्यपदार्थाच्या निष्कृष्ट असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रवाशांकडून केल्या जाते. मात्र यावर रेल्वेकडून लक्ष दिल्या जात नाही आहे. रेल्वेनी यासाठी वारंवार खाद्यपदार्थ स्टॉलची पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र ते आज होताना दिसून येत नाही. प्रवाशांच्या तक्रारीला सुद्धा रेल्वे गांभिर्याने घेत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशासनाणें प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनावर तत्काळ कारवाई करावीत. सोबतच या दोषी असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलधारकांवर तत्काळ कारवाई कारवाई अशी मागणी पुण्याच्या रेल्वे प्रवासी ग्रुपची अध्यक्षा हर्षा शाहा यांनी केली आहे.


मुंब्रा, कळव्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -