घरदेश-विदेशमथुरेतील मंदिरात नमाज पठणार्‍या दोघांना अटक

मथुरेतील मंदिरात नमाज पठणार्‍या दोघांना अटक

Subscribe

चार व्यक्तींनी मंदिरातील सेवकांची दिशाभूल केली

उत्तर प्रदेशात मथुरेतील एका मंदिरात नमाज पठण केल्याने वाद निर्माण झाला आहे. मथुरेतील नंद बाबा मंदिरात फसवून नमाज पठण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मथुरेतील नंद बाबा मंदिरात चार जण आले होते. यापैकी दोन जणांनी मंदिरातील सेवकांची दिशाभूल केली आणि मंदिर परिसरातच नमाज पठण केले. २९ ऑक्टोबरला ही घटना घडलीय. याप्रकरणी आता बरसाना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युपी पोलिसांनी आरोपी फैसल खानला दिल्लीतून अटक केलीय. आपण फसवून नमाज पठण केले नाही. तर मंदिरात उपस्थित अनेकांसमोर नमाज पठण केले. काहीही चूक केलेली नाही, असे फैजल खानने म्हटलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -