घरताज्या घडामोडीUP election 2022 : रूद्राक्ष, रिवॉल्वर - रायफल अन् कुंडल, योगी आदित्यनाथ...

UP election 2022 : रूद्राक्ष, रिवॉल्वर – रायफल अन् कुंडल, योगी आदित्यनाथ यांची संपत्ती बघा

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी गोरखपुर शहरात योगींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन दाखल करतानाच प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. प्रतिज्ञापत्रातील घोषणेनुसार १.५४ कोटी रूपयांची योगींची संपत्ती आहे. तर एकही गुन्हा दाखल नसल्याचे योगींनी जाहीर केले आहे.

किती आहे योगींची संपत्ती ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात दाखल केल्यानुसार योगींची एकुण १ कोटी ५४ लाख ९४ हजार ५४ रूपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये १ लाख रूपयांची रोख रक्कमही समाविष्ट आहे. तर २०१७ मध्ये विधान परिषदेच्या निवडणूकीत योगींनी जाहीर केलेली संपत्ती ९५.९८ लाख इतकी होती. ५ वर्षांमध्ये योगींची संपत्ती ६० लाख रूपयांनी वाढली आहे.

- Advertisement -

कोणत्या गोष्टींचे योगी मालक ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखल केलेल्या अॅफिडिव्हेटनुसार त्यांच्याकडे एकूण १ कोटी ५४ लाख ९४ हजार ५४ रूपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये १ लाख रूपये रोख रक्कम आहे. सीएम योगी यांचे दिल्ली, लखनऊ आणि गोरखपुर याठिकाणी ६ ठिकाणी वेगवेगळ्या बॅंकेत अकाऊंट आहेत. या अकाऊंटमध्ये १ कोटी १३ लाख ७५ रूपये जमा आहेत. सीएम योगी यांच्या नावे जमीन किंवा घर नाही. पण नॅशनल सेव्हींग स्कीम आणि विमा योजनांचे ३७.५७ लाख रूपये त्यांच्या खात्यात जमा आहेत. तसेच दहा ग्रॅमची सोन्याची १२ हजार किंमतीची चैन आहे. तसेच कोणतीही अचल संपत्ती नाही. तसेच २० ग्रॅमचे कुंडलही त्यांच्या नावे आहे. मुख्यमंत्री योगी हे एचएन बहुगुणा विश्वविद्यालय, श्रीनगर तसेच पौडीगढवाल येथून बीएसस्सी पदवी त्यांनी मिळवली आहे.

सीएम योगींकडे एक १२ हजार रूपयांचा मोबाईल फोनही आहे. याआधी योगींनी आपल्याकडे दोन कार असल्याची माहिती दिली होती. पण यंदाच्या मालमत्तेत त्या कारचाही समावेश नाही.

- Advertisement -

सीएम योगींकडे वैयक्तिक वापरासाठी अशी दोन हत्यारेही आहेत. त्यामध्ये १ लाख रूपयांची रिवॉल्वर आणि ८० हजार रूपयांच्या रायफलचाही समावेश आहे.

पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार

योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढणार आहेत. याआधी योगींनी आपली पहिली निवडणूक ही २६ वर्षाचे असताना लढली होती. योगींनी पहिल्यांदा १९९८ मध्ये गोरखपूर येथून निवडणूक लढली होती. त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये योगी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये योगींना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा योग आला. त्यावेळी खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -