घरमहाराष्ट्रVande Bharat: महाराष्ट्रात 'या' सात मार्गांवर लवकरच धावणार वंदे भारत; 'असा' असेल...

Vande Bharat: महाराष्ट्रात ‘या’ सात मार्गांवर लवकरच धावणार वंदे भारत; ‘असा’ असेल रूट

Subscribe

केंद्र शासन या चालू वर्षात महाराष्ट्राला तब्बल सात नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत

Vande Bharat: महाराष्ट्रासाठी 2024 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि खास राहणार आहे. या चालू वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या चालू वर्षात महाराष्ट्राला तब्बल सात नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.(Vande Bharat Vande Bharat will soon run on these seven routes in Maharashtra as will be the root)

देशात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 15 नोव्हेंबर 2019 रोजी सुरू झाली. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरू झालेल्या या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सप्टेंबर 2022 मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन सुरू झाली. ही ट्रेन मुंबई ते गांधीनगर आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत रेल्वेची मागणी वाढत आहे. वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे.

- Advertisement -

‘या’ सात मार्गांवर धावणार रेल्वे

महाराष्ट्रात सात मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरू आहे. राज्यात सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर 30 सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाली. त्यानंतर नागपूर बिलासपूर वंदे भारत ट्रेन डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाली. मुंबई सोलापूर वंदे भारत पुणे शहरातून जात होती. मुंबई शिर्डी रेल्वेही फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आली.

मुंबई मडगाव आणि नागपूर-इंदूर जून महिन्यात सुरू झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मुंबई जालना ही रेल्वे सुरू झाली. देशात एकूण 41 मार्गांवर रेल्वे सुरू आहेत.

- Advertisement -

या मार्गावरून धावणार वंदे भारत

वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार केला जात नाही. नवीन नवीन मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. महाराष्ट्रात आणखी सात मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. त्यात मुंबई अहमदाबाद, मुंबई शेगाव, पुणे बेळगाव, पुणे बडोदा, पुणे सिंकदराबाद, मुंबई कोल्हापूर या मार्गांचा समावेश आहे. या वर्षभरात या सर्व मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.

(हेही वाचा: Ram Mandir वादग्रस्त जागा अजूनही तशीच, बाबरीपासून 3KM दूर राम मंदिर; Sanjay Raut यांचा दावा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -