घरमहाराष्ट्र'पंढरपूरमधील आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिरं होणार खुली'

‘पंढरपूरमधील आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिरं होणार खुली’

Subscribe

पंढरपूर येथे आपल्या समर्थकांसह विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात प्रवेश करुन हे आंदोलन करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरं, धार्मिक स्थळं बंद आहेत. राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी शनिवारी भाजपचे राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. मुंबई, शिर्डी, पुणे, नाशिकमध्येही घंटानाद आंदोलन करत मंदिरं सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनासाठी रवाना झाले आहे आहेत.

यावेळी ते पंढरपूर येथे आपल्या समर्थकांसह विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात प्रवेश करुन हे आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरं खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता.

- Advertisement -

“पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.”, असे आंबेडकर म्हणाले तर यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त करताना भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी, असेही ते म्हणाले.

या आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा आहे, मात्र आंदोलनात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकरांसह सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले आहेत.


कोरोनाचा फैलाव दिवाळीपर्यंत नियंत्रणात येणार – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -