घरमहाराष्ट्रJayant Pawar : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

Jayant Pawar : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

Subscribe

गिरणीतील नोकरीनंतर 'आपलं महानगर' पासून जयंतचा सुरु झालेला लेखन प्रवास कायम सद्य परिस्थितीला भिडणारा होता

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं निधन झालं आहे. ते ६५ वर्षांचे होते. पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. गेली आठ वर्षे ते कॅन्सर या आजाराशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज आज अखेर संपली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे आणि मुलगा असा परिवार आहे. जयंत पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२.३० वाजता बोरिवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गिरणीतील नोकरीनंतर ‘आपलं महानगर’ पासून जयंत यांचा सुरु झालेला लेखन प्रवास कायम सद्य परिस्थितीला भिडणारा होता. ‘आपलं महानगर’नंतर त्यांनी कित्येक वर्षे महाराष्ट्र टाइम्समध्ये नाट्य समीक्षा, सांस्कृतिक लिखाण केले. त्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले.

जयंत पवार य़ांनी नाटक आणि लिखाण क्षेत्रात आपली वेगळी छबी निर्माण केली. त्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या दर्जेदार लिखाणाचा एक वेगळा वाचक वर्ग होता. पवार यांनी लिहिलेल्या नाटक आणि कथांनी मराठी साहित्य विश्वात वेगळा ठसा उमटवला. ‘फीनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या त्यांच्या कथासंग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारने गौरवण्यात आले. याशिवाय ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक देत कौतुक केले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

- Advertisement -

त्यांच्या अधांतर या नाटकावर आधारित लालबाग परळ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तर चंदूच्या लग्नांची गोष्ट या कथेवर रज्जो हा हिंदी चित्रपट बनविण्यात आला.

२०१४ सालच्या महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार यांनी अध्यक्षपद भूषवले होते. ‘प्रयोग मालाड’ या नाट्यसंस्थेने १३-१४ ऑक्टोबर २०१८ या दिवसांत ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या १४ एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. अश्या स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.

- Advertisement -

जयंत पवार यांनी आत्तापर्यंत अंधातर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी, पाऊलखुणा, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक अशी अनेक नाटकांसाठी लिखाण केले. तर १५ एकांकिका त्यांना लिहिल्या. काय सिद्धीस जाण्यास समर्थ आहे, होड्या, घुशी या त्यांच्या एकांकिकांचे आत्तापर्यंत शेकडो प्रयोग झाले.

माझे घर, वंश, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) हे त्यांचे उत्कृष्ठ लिखाण साहित्य नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -