घरमहाराष्ट्रव्हिडीओकॉनचे मालक वेणुगोपाळ धूत यांना अटक

व्हिडीओकॉनचे मालक वेणुगोपाळ धूत यांना अटक

Subscribe

आयसीआयसीआय थकीत कर्ज घोटाळा प्रकरण भोवले

आयसीआयसीआय बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी व्हिडीओकॉन समूहाचे संचालक वेणुगोपाळ धूत यांना अटक केली. याप्रकरणी सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. कोचर दाम्पत्य आणि वेणुगोपाळ धूत यांना विशेष सीबीआय न्यायालयापुढे हजर केले असता तिघांनाही ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंदा कोचर यांच्या हाती आयसीआयसीआय बँकेची सूत्रे असताना आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये व्हिडीओकॉन कंपनीला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने मंजूर केल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे. या मोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबल कंपनीत व्हिडीओकॉन समूहाच्या सुप्रीम एनर्जीने ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

- Advertisement -

या कंपनीत दीपक कोचर यांची ५० टक्के भागीदारी होती. यानंतर व्हिडीओकॉन समूहाचे कर्ज हे थकीत कर्ज म्हणून रूपांतरित करण्यात आले. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून या घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानुसार तपास करीत २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -