घरमहाराष्ट्रविश्वनाथ पाटलांचा काँग्रेसला रामराम; कुणबी सेना अखेर भाजपचा सहयोगी

विश्वनाथ पाटलांचा काँग्रेसला रामराम; कुणबी सेना अखेर भाजपचा सहयोगी

Subscribe

गुरूवारी मध्यरात्री पाटील यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्रयाशी बैठक झाली. या बैठकीत पाटील यांची नाराजी दूर करून त्यांना भाजपच्या गळाला लावण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदार संघातून कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील व शिवसेनेचे बंडखोर सुरेश म्हात्रे यांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपच्या मार्गातील काटे काहिसे दूर झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरू होती. कुणबी सेनेचे पाटील यांना भाजपच्या गळयाला लावण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत. मी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, कुणबी सेना हा भाजपचा सहयोगी बनला आहे अशी प्रतिक्रिया विश्वनाथ पाटील यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे भिवंडीच्या निवडणुकीच्या माध्यमातून फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

भिवंडीतून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. पाटील यांच्या विषयी शिवसेनेत तीव्र विरोध असल्याने सेनेचे ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज सादर केला होता. मात्र काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्याविरोधात दंड थोपटून अपक्ष अर्ज सादर केला होता. त्यामुळे टावरे आणि पाटलांच्या वाटेत काँटे उभे राहिले होते.

- Advertisement -

मात्र, शुक्रवारी म्हात्रे आणि पाटील या दोघांनीही आश्चर्यकारकरित्या उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. कुणबी सेनेने भाजपला साथ दिल्याने त्यांची ताकद वाढली आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेऊन पाटील यांची मुख्यमंत्रयाशी भेट घडवून आणली. गुरूवारी मध्यरात्री पाटील यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्रयाशी बैठक झाली. या बैठकीत पाटील यांची नाराजी दूर करून त्यांना भाजपच्या गळाला लावण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत. पाटील यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्रयानी मान्य केल्या आहेत. भिवंडी मतदारसंघात कुणबी सेनेची एकगठ्ठा मते आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या बेरजेच्या राजकारणाचा भाजपला किती फायदा होतो हेच पहावे लागणार आहे.

”माझे विजयाचे गणित जुळंत नसल्याने मी माघार घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्रयानी माझा अजेंडा मान्य केला आहे. गेली ४२ वर्षे मी या विभागासाठी लढत आहे. आजपर्यंत जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आंदोलन केली. ती सगळी त्यांनी मान्य केली आहेत. पिण्याच्या पाण्याचा आणि सिचंनाचा प्रश्नही त्यांनी मान्य केला असून त्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. कुणबी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच कुणबी समाजाला विधानसभा अथवा राज्यसभेमध्ये प्रतिनिधीत्व देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. इतर मित्रपक्षाप्रमाणेच कुणबी सेनेला भाजपच्या गठबंधनमध्ये समाविष्ठ करण्यात आला असून, सत्तेचा वाटा मिळणार आहे. भाजपचे सहयोगी झाल्याने शिवसेना भाजपचे उमेदवार असतील तेथे मदत करणार आहे. काँग्रेसचा राजीनामा मी पक्षाकडे सुपूर्द केला आहे.”

– विश्वनाथ पाटील, कुणबी सेना प्रमुख 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -