घरमहाराष्ट्रथेंब थेंब पाण्यासाठी असा व्याकुळला जीव !

थेंब थेंब पाण्यासाठी असा व्याकुळला जीव !

Subscribe

उन्हाचा कडाका वाढत चाललेला असताना पक्षी, प्राण्यांना त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने अनेक पक्षी-प्राणीप्रेमी त्यांच्यासाठी सध्या पाण्याची सोय करताना दिसत आहेत. पक्षी किंवा प्राणी तहानेने व्याकूळ होऊन पाण्यासाठी भटकंती करीत असतात. बरेच वेळा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उष्माघाताने त्यांचा मृत्यूही होतो. अशा वेळी पक्षी आणि प्राणी पाणी मिळत नसल्यामुळे सैरभैर होतात. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे साठेही आटलेले असतात. सध्या जंगलात राहणारी माकडे पाण्यासाठी नागरी वस्तीतील किंवा आडमार्गाच्या पाणवठ्यावर येताना दिसत आहेत. दूरवरच्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी माणसांनाच बरीच पायपीट करावी लागते, अशा वेळी प्राणी आणि पक्षी यांची काय स्थिती होत असेल याची कल्पना येऊ शकते. नेहमीच्या तलावामधील पाणी पिण्यालायक नसल्याने पशुधनालाही पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -