घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेचे इ-कनेक्ट अ‍ॅप अखेर प्ले-स्टोअरवर अवतरले

महापालिकेचे इ-कनेक्ट अ‍ॅप अखेर प्ले-स्टोअरवर अवतरले

Subscribe

काही परवानग्यांच्या पूर्ततेसाठी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलेले महापालिकेचे इ-कनेक्ट अ‍ॅप अखेर पुन्हा एकदा नाशिककरांसाठी उपलब्ध झाले आहे.

काही परवानग्यांच्या पूर्ततेसाठी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलेले महापालिकेचे इ-कनेक्ट अ‍ॅप अखेर पुन्हा एकदा नाशिककरांसाठी उपलब्ध झाले आहे. नागरिकांनी पालिकेच्या सेवा, सुविधा व नागरी तक्रारींसाठी या अ‍ॅप्लिकेशनचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

नाशिक महापालिकेचे एनएमसी-इ-कनेक्ट’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाल्याने पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाला हरताळ फासल्याची चर्चा सर्वदूर पसरलीे होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्पष्टीकरणाचे सविस्तर पत्रक प्रसिध्द केले होते. गुगलने आपल्या विकास धोरणात सुधारणा केली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेच्या एनएमसी इ- कनेक्ट अ‍ॅपमधील काही परवानग्यांबाबत पूर्तता करण्यासाठी हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन तात्पुरत्या स्वरुपात काढले असून, पालिकेने आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचे पत्रकात म्हटले होते. दरम्यान, महापालिकेने सादर केलेल्या माहितीच्या पडताळणीनंतर गुगलने बुधवार, १७ एप्रिलपासून पालिकेचे अ‍ॅप्लिकेशन प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन दिल्याचे महापालिका आयुक्त गमे यांनी सांगितले.

- Advertisement -

या सुविधा उपलब्ध

महापालिकेच्या या अ‍ॅप्लिकेशनमध्ये क्रार निवारण, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक व माहिती, महापालिकेच्या कामाकाजाशी संबंधित मुलभूत बाबींची माहिती, पोलिस, हॉस्पीटल्स, अ‍ॅम्बुलन्स, रक्तपेढया व इतर महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्याची सुविधा, जन्म दाखले व मृत्यु दाखल्यांबाबतची माहिती, फेसबुक पेज, ट्वीटर हँडल, यू-टयुब, तसेच घंटागाडी व पेस्ट कंट्रोलचे जीपीएस ट्रॅकिंग इ. कामांचा यात समावेश असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -