घरपावसाळी अधिवेशन 2023संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

Subscribe

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेत कामकाजाला सुरूवात करण्यात आली. यावेळी विरोधकांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अगदी खालच्या पातळीवर वादग्रस्त करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत सभागृहात गदारोळ केला.

मुंबई : चार दिवसांच्या ब्रेकनंतर आज सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) विधानसभेत विरोधकांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मात्र, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी संभाजी भिडे यांच्याविषयी निवेदन सादर केले. यावेळी मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख भिडे गुरूजी असा करताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मात्र, संभाजी भिडे आम्हाला गुरूजी वाटतात, काय अडचण आहे? असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले.

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेत कामकाजाला सुरूवात करण्यात आली. यावेळी विरोधकांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अगदी खालच्या पातळीवर वादग्रस्त करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत सभागृहात गदारोळ केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांना शांत करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी भिडेविषयी निवेदन सादर करायला सांगतिले.

- Advertisement -

हेही वाचा : विधिमंडळाचे कामकाज 4 दिवसांच्या ब्रेकनंतर सुरू; उरलेल्या 3 दिवसांत राज्याचे प्रश्न मार्गी लागणार का?

महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार

संभाजी भिडे यांच्यासह अन्य दोघांवर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली असून, त्यांनी स्वीकारली आहे. तर राजापेठ पोलिसांकडे त्या कार्यक्रमाचे फोटो किंवा व्हिडीओ उपलब्ध नसून, ते आता संभाजी भिडे यांचा व्हाईस सॅम्पल घेणार आहेत. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांकडेही संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरुन संभाजी भिडेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याचाही चौकशी केली जाईल अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -

भिडेंच्या प्रश्नांवरून विरोधकांचा सभात्याग

भाई जगताप यांच्याकडून सुद्धा विधान परिषदेत संभाजी भिडेंबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. भिंडेंनी वादग्रस्त वक्तव्यकरून देखील राज्य सरकार त्यांना पाठिशी का घालत आहे? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. ज्यामुळे या प्रकरणी वरच्या सभागृहात सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले. परंतु गृहमंत्र्यांनी सादर केलेल्या निवेदनानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सभात्याग केला.

हेही वाचा : हिंदुत्ववादी सरकार असून कारवाई होत नाही हे दुर्दैव, भिडेंबाबत अंबादास दानवेंची टीका

सावरकरांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही

जर आता महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आंदोलन केली जात आहेत. अगदी त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केल्या गेलेले वादग्रस्त वक्तव्यसुद्धा खपवून घेणार नाही त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असेही यावेळी देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

यशोमती ठाकूर यांना संरक्षण दिले जाईल

यावेळी सभागृहात संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर कारवाईची मागणी करणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्याला ट्वीटरवरुन धमकी आल्याचे सांगत त्यांच्यावर कधी कारवाई होणार अशी मागणी केली. त्यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदर यशोमती ठाकूर यांना संरक्षण दिले जाणार आणि ज्यांनी ही धमकी दिली त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी सभागृहात दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -