घरमहाराष्ट्रठाकरे सरकार वाझेंना का वाचवतंय - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

ठाकरे सरकार वाझेंना का वाचवतंय – देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Subscribe

निष्पक्ष चौकशी-गृहमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. मनसुख हिरेन यांची हत्याच झाली आहे. यामध्ये सचिन वाझे यांचा हात असल्याचे दिसत आहे. मात्र, सचिन वाझेंना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार ताकद एक करत आहे. पूर्ण ताकद लावत आहे. सचिन वाझे नेमकी कोणाकोणाची नावे घेतो याच्या भीतीने ठाकरे सरकार वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते मंगळवारी विधी मंडळाबाहेर मीडियाशी बोलत होते.

सचिन वाझेंनी अनेक गोष्टी लपवल्या
मनसुख हिरेन हे शेवटचे धनंजय गावडे यांना भेटले होते. २०१७ च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केले होते. या दोघांना जामीन मिळाला आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. मनसुख हे गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, याचा सरळसरळ अर्थ असा आहे की त्यांची हत्या झाली आहे. एवढे पुरावे असताना आमची मागणी एकच होती, सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे पुरावे नष्ट करण्याचे रिसोर्सेस आहेत. त्यामुळे त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. जी गाडी गुन्ह्यासाठी वापरली आहे ती गाडी चार महिने सचिन वाझेंकडे होती हे त्यांनी लपवले आणि वाझे हे मनसुख हिरेनला ओळखत होते हेही त्यांनी लपवले. त्यामुळे वाझेंवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. मात्र, आयपीसी 201 अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे,अशी आमची मागणी असल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

इनोव्हा मुंबईतच
सचिन वाझे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांना वाचवण्यासाठी इतका फोर्स का लावताय? वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत का? विरोधी पक्षनेत्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा घाबरणारा विरोधी पक्षनेता नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जी इनोव्हा गाडी होती, ती मुंबईतच आहे, त्या गाडीची माहिती मिळाल्यास, मी माधमांसमोर घेऊन येईन, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर गृहमंत्री देशमुख फिरले
सचिन वाझेंना बाजूला केले तर अनेकांची नावे समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, तेव्हा गृहमंत्र्यांनी कबूल केले वाझेंना पदावरून हटवण्याचे. त्यानंतर गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्री फिरले. वाझेला पदावरुन दूर करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. याचे कारण काय? असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राला बदनाम करू नका
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर ऐवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही. त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्ज्वल परंपरा आहे. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. त्यांच मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले, अशी भाषा तेच वापरू शकतात. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे माझे फडणवीस यांना आवाहन आहे. -अनिल देशमुख, गृहमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -