घरमहाराष्ट्रWinter Session : आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या उत्तरामुळे प्रणिती शिंदे संतापल्या, म्हणाल्या...

Winter Session : आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या उत्तरामुळे प्रणिती शिंदे संतापल्या, म्हणाल्या…

Subscribe

नागपूर : गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला. याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. 13 डिसेंबर) विधानसभेत केली. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत श्री. वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विधानसभेत प्रशोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढत जोरदार हल्लाबोल केला. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयावरून प्रश्न उपस्थित केला. सोलापूर जिल्हा रूग्णालयामध्ये औषधांच्या तुटवडा असल्याचे प्रणिती शिंदे यांच्याकडून सभागृहात सांगण्यात आले. पण त्यांच्या या प्रश्नाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी असमाधानकारक आणि न पटणारे उत्तर देणारे प्रणिती शिंदे या आरोग्य मंत्र्यांवर संतापलेल्या पाहायला मिळाल्या. (Winter Session: Praniti Shinde got angry due to Health Minister Tanaji Sawant’s reply)

हेही वाचा – Winter Session : आरोग्य विभागाच्या कारभारावरून विरोधक आक्रमक, राजीनाम्याच्या मागणीवरून सभात्याग

- Advertisement -

यावेळी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आरोग्य शिबिरामध्ये लोह, मधुमेहाच्या गोळ्या जबरदस्ती दिल्या जातात. ज्यामुळे सिव्हिल रूग्णालयात गर्भवती महिलांसाठी औषधांचा तुटवडा होतो. सिव्हिल रूग्णालयात सीटी स्कॅनच्या मशिन्स बंद आहेत, त्यामुळे त्यांना प्रायवेटमधे जावे लागते. याबाबतचे पत्र मी अनेकदा संबंधित मंत्र्यांना दिले आहे. इतकेच नाही तर सोलापूरातील एक रुग्णालय हे केवळ फर्निचर नसल्याने अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. ज्यामुळे ते कधी सुरू करणार, असा प्रश्न आमदार शिंदे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना “सिव्हिल रूग्णालयाचा प्रश्न वैद्यकीय शिक्षणाचा आहे. औषधांच्या तुटवड्याच्या प्रश्नासाठी मला कधी पत्रच दिले नाही तर मी कशी कारवाई करणार? मला पत्र द्या तर मी तातडीने कारवाई करेल.” असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सांगण्यात आले.

मात्र, तानाजी सावंत यांच्याकडून असमाधानकारक उत्तर मिळाल्याने प्रणिती शिंदे या संतापल्या. ज्यानंतर त्यांनी भर सभागृहात मंत्री सावंताना सुनावत म्हटले की, माझ्यावर व्यक्तिगत टीका होईल असे अपेक्षित नव्हते या मंत्र्यांचा आदर मी करते. आम्ही जनतेचे प्रश्न विचारत आहोत. तुम्ही वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री नाहीत म्हणालात मग पत्र कसे लिहिणार. मी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र दिले आणि प्रश्न लागत नाही म्हणून हा प्रश्न विचारला.

- Advertisement -

तर, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेले उत्तर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा न पटल्याने त्यांनी यावरून आरोग्य मंत्र्यांची कानउघडणी केली. “लोकप्रतिनिधींनी पत्र दिले तरच काम करायचे नसते. जनतेचे प्रश्न सोडवणे हे सरकारच काम असते. सरकारचे नाही तर लोकप्रतिनिधीचे देखील काम आहे. जनेतची काम करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे,” असे यावेळी विधानसभा अध्यक्षांकडून नमूद करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -