घरमहाराष्ट्रमुंबईत जाणवू लागली आता गुलाबी थंडी

मुंबईत जाणवू लागली आता गुलाबी थंडी

Subscribe

मुंबईत आता गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. मुंबई उपनगरात विशेषत: पहाटेच्या वातावरणात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. दुपारी मुंबईचा पारा थेट ३३ अंश सेल्सिअसपर्यंत चढत असताना पहाटे मात्र थंड वारे वाहू लागले आहेत. उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढले की, उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे मुंबईत थंडी वाढते. सध्या उत्तर भारतातून थंड वारे वाहू लागल्यामुळे मुंबईत पहाटेच्या सुमारास थंडी जाणवू लागली आहे.

मुंबईत अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत होता. रस्यावर जाणे-येणे अगदी नकोसे झाले होते. त्यातच आता मुंबईत गुलाबी थंडीची एंट्री झाली असून, तापमान तीन अंशाने घसरले आहे. सांताक्रुझ हवामान विभागाने मंगळवारी २०.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली आहे. दररोजच्या तापमानापेक्षा १.८ अंश सेल्सिअसने मुंबईचे तापमान घसरले आहे. त्यामुळे आला थंडीचा महिना त्यामुळे अनेक ठिकाणी गुलाबी थंडीचा आनंद लुटत मुंबईकरांनी शेकोट्या पेटवायलाही सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी किमान २३.४ तापमानाची नोंद झाली होती. या तापमानात घट होऊन मुंबईचे तापमान २१ अंशांवर येऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी सकाळच्या वेळेत थंडी जाणवली. मात्र, दुपारी पुन्हा उन्हाची झळ मात्र जैसे थे पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईकरांवर अखेर स्वेटर बाहेर काढण्याची वेळ आली आहे. त्यातच आता गुलाबी थंडीसोबत चहाचा आस्वाद घेण्याची मज्जाच काही और आहे. त्यामुळे मुंबईकर गुलाबी थंडीत सुखावलेले पाहायला मिळत आहेत.

बुधवारी कुलाब्यात ६२ टक्के तर सांताक्रूझमध्ये ५७ टक्के सापेक्ष आर्द्रता होती. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागांतील शेतीवरही याचा परिणाम पाहायला मिळाला. या अवकाळी पावसामुळे मुंबईतील तापमान ३७ अंशांवरून ३३ अंशांवर घसरला होता. सामान्य तापमानापेक्षा ०.३ अंश सेल्सिअस तापमान घसरले आहे. कुलाबा वेधशाळेने २३.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -