घरताज्या घडामोडीST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून संपावर आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ७ व्या वेतन आयोगानुसार पगार द्यावा तसेच थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे अशा प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. मनसेकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला या आधीच पाठींबा देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे कर्मचारी रुजू होणार नाही अशा ९१८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या मगाण्यांसदर्भात माहिती आणि आंदोलनाला पाठींबा देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. मात्र मनसेने यापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. ठाकरेंनी आपले वजन वापरुन शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे. एसटी तोट्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन आणि एसटीला शासकीय सेवेत विलीनीकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने कामागारांच्या मागणीसाठी एक समिती गठीत केली असून ही वेळ खाऊ प्रक्रिया असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन केलं आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचेही आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.

राज्य सरकारने एसटी महामंडळाला न्यायालयाचा अवमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार आतापर्यंत ९१८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त एसटीचे नुकसान झालं आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांना भाजपचा पाठींबा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केलं आहे. मात्र भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. आझाद मैदानावर भाजप नेते गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


हेही वाचा :  प्रवाशांना वेठीस धरणारे एसटी आंदोलन मागे घ्या


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -