घरमहाराष्ट्र'आर्ची'च्या जीवनचरित्रावर प्रकाशित झाले पुस्तक

‘आर्ची’च्या जीवनचरित्रावर प्रकाशित झाले पुस्तक

Subscribe

लेखक स्वप्नील कळसकर यांनी 'आर्ची' पुस्तकातून भूतदयेचा संदेश दिला आहे.

लेखक स्वप्नील कळसकर यांनी लिहिलेल्या ‘आर्ची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या पुस्तकातून लेखकाने प्राणिमात्रांवर दया करावी, असा भूतदयावादी संदेश दिला आहे. यात त्यांनी आर्ची या पाळलेल्या कुत्रीची वास्तविक कथा लिहिली आहे. शारदा प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ कवी प्रा. दामोदर मोरे, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक प्रा. प्रशांत धर्माधिकारी , प्रकाशक संतोष राणे , चित्रकार निलेश बागवे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादुगार अभिजीत पवार, जनार्दन कळसकर, सौ.जयश्री कळसकर, माजी पोलीस कान्हा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

‘संवेदनशून्य समाजाची निर्मिती घातक’

अत्याधुनिक संशोधनामुळे माणसाची प्रगती झाली हे खरे असले तरी या प्रगतीत मानवाने स्वत: मनाची संवेदना हरवलेली आहे. असा संवेदनाहीन समाज निर्माण होणे जगाच्या दृष्टीने घातक असल्याचे आहे, असे ज्येष्ठ कवी प्रा. दामोदर मोरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘आर्ची’ नावाच्या कुत्रीला अतिशय प्रेमाने सांभाळणारे आणि तिच्या विरहाने व्याकुळ होणारे स्वप्नील कळसकर या पुस्तकातून मानवी संवेदनांचा आलेख मांडतात. एकीकडे आर्चीचा प्रेमाने सांभाळ करणारे कळसकर कुटुंबीय आणि आर्चीला सात लहान पिल्ले झालेली असताना तिला विष घालून मारून टाकणारे काही गावकरी यांचे भीषण चित्र या पुस्तकात दिसते. माणसापेक्षा प्राणी किती जीव लावतात याचा प्रत्ययकारी अनुभव या पुस्तकात लेखकाने रेखाटला आहे. प्राण्यांची संवेदनशीलता माणसांनी घेण्याची गरज आहे. केवळ भौतिक सुखाच्या मागे लागून संवेदनशून्य समाजाची निर्मिती झाली तर ते अत्यंत घातक आहे.

- Advertisement -

काय म्हणाले लेखक?

‘प्राणीमात्रावर प्रेम करा हे वाक्य फक्त शाळेत शिकण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष आयुष्यातही त्याचा अंमलबजावणी झाली पाहिजे’, असे लेखक स्वप्नील कळसकर म्हणाले. यापुढे त्यांनी सांगितले की, ‘माझा मुलगा पार्थ याच्या हट्टामुळे आम्ही आर्चीला घरी आणले.तिचा मुलीसारखा सांभाळ केला. आर्चीने आमचे भावविश्व समृद्ध केले. तिच्याकडून लळा, प्रेम या शब्दांचा खरा अर्थ कळाला. मुके प्राणी टोकाचे प्रेम करतात. माणसाला ते का जमू नये, असे अनेक प्रश्न आर्ची आमच्यासोबत ठेवून गेली.’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -