घरलोकसभा २०१९जरा हटकेपंतप्रधानांवरील वेबसिरीजचा ट्रेलर एकदा बघाच

पंतप्रधानांवरील वेबसिरीजचा ट्रेलर एकदा बघाच

Subscribe

'मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही वेबसिरीजचे एकूण १० भाग आहेत. एक चहा विक्रेता मुलगा ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लवकरच मोदींच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिकही ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या बायोपिकवरून अनेक वाद सध्या सुरू आहेत.

कशी आहे वेबसिरीज

- Advertisement -

‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ ही वेबसिरीजचे एकूण १० भाग आहेत. नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून ते आतापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटनांचा या वेबसिरीजमध्ये समावेश करण्यात आला आहे. एक चहा विक्रेता मुलगा ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेबसिरीजचे १०२ नॉट आऊट चे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता महेश ठाकूर यात नरेंद्र मोदींच्या मुख्य भुमिकेत आहेत. मात्र मोदींच्या वेगवेगळ्या भुमिकेत फैसल खान आणि आशिष शर्मा दिसणार आहेत. या वेबसिरीजची कथा सीरिज मिहीर भूता आणि राधिका आनंद यांनी लिहीली आहे. ही वेबसिरीज एप्रिलमहिन्यात पाहता येणार आहे.

पंतप्रधानांच्या कवितेची खास झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली कविता ‘मोदी- द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’मध्ये वापरण्यात आली आहे. या कवितेविषयी बोलताना दिग्दर्शक उमेश शुक्ला म्हणाले,’जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याशी गोष्टींचा अभ्यास करत होतो, तेव्हा आम्हाला त्यांनी लिहिलेल्या कविता मिळाल्या. या कवितांचा वापर आम्ही सीरिजमध्ये केला आहे. आम्ही त्यांची ‘श्याम के रोगन रेले’ ही कविता या वेब सीरीजमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -