घरमहाराष्ट्रमुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनसह ऑफलाईन

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनसह ऑफलाईन

Subscribe

राज्यभरात एक लाख 91 हजार परीक्षार्थी प्रविष्ट होणार, 38 हजार परीक्षार्थी ऑफलाईन परीक्षा देऊ शकतील

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. राज्यभरात एक लाख 91 हजार परीक्षार्थी प्रविष्ट होणार असून त्यातील 20 टक्के म्हणजेच 38 हजार परीक्षार्थी ऑफलाईन परीक्षा देऊ शकतील. राज्यभरातील सेतू सेंटर व आपलं सरकार केंद्रांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुक्त विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि.20) आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या 23 सप्टेंबरपर्यंत परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर होईल. ऑक्टोबर अखेरपर्यंत या परीक्षा घेण्यात येणार असून, 30 ऑक्टोबरपूर्वी निकाल जाहीर होतील.

- Advertisement -

कृषी अभ्यासक्रम राज्यस्तरावर

विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठाचे कृषी व इतर काही अभ्यासक्रम केले आहेत.या अभ्यासक्रमासह बंद झालेले अभ्यासक्रम राज्यस्तरावर सुरू करण्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना सामंत यांनी कुलगुरूांना केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -