घरमहाराष्ट्रतुम्ही दिलेल्या केंद्रावरच जातो पण प्रवास खर्च द्या; वाचा कोणत्या परीक्षार्थ्यांनी केली...

तुम्ही दिलेल्या केंद्रावरच जातो पण प्रवास खर्च द्या; वाचा कोणत्या परीक्षार्थ्यांनी केली अशी मागणी

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट 'क' संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होत आहे.

मुंबई : तीन टप्प्यात होऊ घातलेल्या शासनाच्या महसूल विभागा अंतर्गंत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीची पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, या परीक्षेच्या परीक्षार्थ्यांनी निवडलेल्या तीन केंद्राऐवजी भलकेच परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही दिलेल्या परीक्षा केंद्रावर जातो पण प्रवास खर्च द्या अशी मागणीच आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.(You go to the given center but pay the travel expenses Read what the examinees demanded)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होत आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्र ऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचे दिसत आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेडच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

निवडलेले परीक्षा केंद्रच दिले नाही

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 17 ऑगस्ट रोजी परीक्षा होत आहे. मात्र परीक्षार्थींचे परीक्षा केंद्रच त्यांच्या मुळ ठिकाणापासून 400 ते 500 किलो मीटर अंतरावर देण्यात आले आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्रच दिले गेले नाही. औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र् देण्यात आले आहे.

हेही वाचा : शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवार थेटच बोलले; काय म्हणाले वाचा-

- Advertisement -

जास्तीचा परीक्षा शुल्कविरोधात उठवला होता आवाज

तलाठी भरतीसाठी राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जास्तीचा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याने आधीच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला होता. तो विरोध मावळत नाही तोच आता परीक्षार्थ्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्राएवजी भलतेच परीक्षा केंद्र देण्यात आल्याने पुन्हा ही भरती प्रक्रिया वादात अडकली आहे.

हेही वाचा : जयंत पाटीलही जाणार अजित पवारांसोबत, जलसंपदा खात्यासाठी आग्रही; श्रावणात शपथविधी?

भरती आणि घोटाळे, परीक्षार्थ्यांचे वाटोळे

आतापर्यंत राज्यात नोकरभरती घोटाळे सुरू असून, वन विभाग, मुंबई पोलीस भरती आदी परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत. तलाठीची परीक्षा समोरच असून, पेपरफोड्या थांबविण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर पेपरफुटी कायदा करावा व परीक्षेचे शुल्क कमी करण्याची मागणी सरकार दरबारी मांडण्याची मागणी यावेळी विध्यार्थ्यांनी पटोले यांच्याकडे केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -