घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरManoj Jarange: इंटरनेट बंद, एसटी सेवाही ठप्प; जरांगेंच्या आंदोलनामुळे 'या' जिल्ह्यांत तणाव

Manoj Jarange: इंटरनेट बंद, एसटी सेवाही ठप्प; जरांगेंच्या आंदोलनामुळे ‘या’ जिल्ह्यांत तणाव

Subscribe

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते तडकाफडकी मुंबईच्या दिशेनं यायला निघाले. परंतु अंबड तालुक्यात सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी या गावात दाखल झाले. परंतु जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरातील आंदोलकही आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी एसटी पेटवून दिल्या जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. 10 तास ही सेवा बंद राहणार आहे. (Manoj Jarange Internet off ST services also stopped Tension in these districts due to agitation by Manoj Jarange)

संभाजीनगर येथील एसटी सेवा बंद

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या आंतरवाली सराटी गावात असून, त्यांनी सर्व आंदोलकांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जरांगे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम

मनोज जरांगे आज मुंबईकडे निघणार होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीने जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या अधिसूचनेवर ठाम राहणर असल्याचं म्हटलं. संचारबंदी उठवल्यानंतर पुन्हा मुंबईकडे, सागर बंगल्यावर जाणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. याशिवाय जरांगे यांनी आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे भांबेरीमधून अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Sanjay Raut :”…तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा”, जरांगेंच्या आरोपांनंतर राऊत संतापले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -