घरमुंबईकाँग्रेस महिला अध्यक्षासह शिवसेना पदाधिकारी भाजपात

काँग्रेस महिला अध्यक्षासह शिवसेना पदाधिकारी भाजपात

Subscribe

अंबरनाथमधील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपचे राजेश वानखेडे यांचा अल्पमतांनी पराभव केला होता. दरम्यान, पालिका निवडणुकीत भाजप नगरसेवक संख्याबळ वाढल्याने अंबरनाथ मतदार संघ भाजपला सोडावा अशी मागणी जोरावर असताना शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने शहरात पक्षांतर चर्चेने खळबळ उडाली आहे.

निलिमा नायडू (काँग्रेस महिला शहर अध्यक्ष), माजी काँग्रेस नगरसेवक लेनिन मुक्कु ,अंब्रेश गौडा (शिवसेना उपविभागप्रमुख), देवेंद्र यादव (उत्तर भारतीय आघाडी शहर संघटक), साईनाथ रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजा महाडीक (यांचा मुलगा रोहित महाडिक हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत), भाट समाजाचे अध्यक्ष भुषण गारुंग, अविनाश गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -