घरमुंबईआचारसंहितेवर पालिकेच्या दहा पथकांचा राहणार वॉच

आचारसंहितेवर पालिकेच्या दहा पथकांचा राहणार वॉच

Subscribe

खड्डे बुजविणार्‍यांच्या कामावरही पथकांची नजर

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरु झाली आहे. आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून पालिकेने जय्यत तयारी केली आहे. विविध दहा पथके आचारसंहितेवर लक्ष ठेवीत असतानाच या पथकांवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामावरही ही पथके वॉच ठेवणार आहेत. महापालिका आयुक्त या पथकांकडून कामाचा आढावा घेणार आहेत.

दोन अधिकार्‍यांचा समावेश असलेले हे पथक प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरून अनधिकृत होर्डींग, बॅनर्स तसेच प्रभाग समितीतंर्गत खड्डे भरणीचे काम कसे सुरू आहे. यावर देखरेख करणार आहे. हे पथक त्यांच्या पाहणीनंतर आढळलेल्या त्रुटींचा अहवाल महापालिका आयुक्तांना माहितीसाठी तसेच संबंधित प्रभाग समितीच्या अधिकार्‍यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करणार आहेत. या पथकाने सादर केलेल्या अहवालावर काय कार्यवाही केली, याचा आढावा स्वतः महापालिका आयुक्त घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -