घरमुंबईदिव्यांगांच्या घरांसाठी ४ हजार अर्जांचे वाटप

दिव्यांगांच्या घरांसाठी ४ हजार अर्जांचे वाटप

Subscribe

ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयुपी प्रकल्पातंर्गत दिव्यांगांना घरे वितरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयामुळे दिव्यांगांना आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत. ठाणे महानगरपालिका ही दिव्यांगांना हक्काची घरे देणारी भारतातील पहिली महापालिका ठरणार आहे. या योजनेसाठी दिव्यांगाना गुरवारपर्यंत तब्बल 4 हजार अर्ज वितरित करण्यात आली आहे.

गुरुवारपर्यंत दिव्यांगांना सुमारे 4 हजार अर्जाचे वितरण करण्यात आले आहेत, तर एकूण 1 हजार 400 दिव्यांगांनी पालिकेत अर्ज जमा केले आहेत. दिव्यांगांना घर मिळावे यासाठी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त वर्षा दीक्षित आणि समाजकल्याण अधिकारी दशरथ वाघमारे यांनी दररोज अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज स्वीकृती आणि छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लकी ड्रॉ प्रमाणे दिव्यांगांना घरे वितरित करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. या प्रक्रियेमध्ये पालिका प्रशासन आणि दिव्यांगांच्या चार संघटनांचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवार, उपायुक्त वर्षा दीक्षित, समाजकल्याण अधिकारी दशरथ वाघमारे आणि दिव्यांगांच्या संघटनेतर्फे प्रहार अपंगक्रांती संस्था ठाणे, धर्मवीर दिव्यांग सेना ठाणे, बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना आणि उत्कर्ष अपंग सेवा संस्था या चार संघटनाचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -