घरमुंबईइराणी टोळीतील दोघांना ४ लाख ५८ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात

इराणी टोळीतील दोघांना ४ लाख ५८ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात

Subscribe

दुचाकी चोरून त्यांचा वापर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्यासाठी करणार्‍या इराणी टोळीतील दोघा अट्टल सोनसाखळी चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट एक पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. जाफर उर्फ भुरेलाल गुलाम हुसेन इराणी ( 23 रा- आंबिवली, कल्याण) आणि फैजलअली उर्फ अलिमामु युसूफअली शेख (24 रा- घाटकोपर, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नाव आहे.

रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी चोरी करून नंतर त्या बाईकचा उपयोग सोनसाखळी चोरी करणासाठी करणारे इराणी टोळीतील चोरटे ठाण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुर्‍हाडे, पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे यांच्या पथकाने घोडबंदर रोड परिसरातील ओवाळा गाव येथे सापळा लावला. आणि दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता ते इराणी टोळीतील सोनसाखळी चोर असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघा चोरट्यांना अटक करून एकूण 9 सोनसाखळी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले. या चोरांकडून सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण 4 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -