घरमुंबईमेट्रो-3 कारशेड अहवाल बंधनकारक नाही

मेट्रो-3 कारशेड अहवाल बंधनकारक नाही

Subscribe

मेट्रो -३ प्रकल्पात कारशेडच्या संभाव्य जागेची चाचपणी करणारा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आला असला, तरीही त्याची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक नाही. अहवालावर अभ्यास करूनच पुढचा निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय अंतिम झालेला नाही. पर्यावरणाची हानी करून कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. शाश्वत विकास पद्धतीचे मॉडेल या सरकारने अवलंब असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिली. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील वरळी स्टेशनच्या ब्रेकथ्रू कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे आतापर्यंतचे निर्णय हे शाश्वत विकासाच्या पद्धतीचेच आहेत. त्याच लक्ष्याने आम्ही पावले उचलली आहेत. हुमन डॅम येथे उद्धव ठाकरे यांनी टायगर कॉरिडोर सुचवला आहे. तर गोल्फ कोर्स येथे फ्लेमिंगो अधिवास होऊ शकते का? याची चाचपणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली आहे. पण अहवालाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मेट्रो कारशेडबाबत नेमलेल्या समितीने आरेची निवड केली असेल तर प्रकल्पासाठी हा एक सकारात्मक निर्णय आहे. या प्रकल्पाला होणार्‍या विलंबामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७ कोटी रूपयांचा खर्च वाढत आहे. म्हणूनच आरे कॉलनीतच कारशेड तयार करण्यासाठीची स्थगिती सरकारने उठवायला हवी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारने अहवाल स्वीकारून आरे कारशेडचे काम वेगाने करायला हवे अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय आहे समितीचा अहवाल?
मेट्रोचे कारशेड इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नाही. त्यामुळे आरेमध्येच मेट्रो कारशेडचे काम सुरू करावे, अशी शिफारस चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच या समितीची स्थापना केली होती. या समितीने मुख्यमंत्र्यांना सोमवारी अहवाल सादर केला आहे. कारशेडच्या बांधकामावरची स्थगिती उठवण्याची शिफारसही या अहवालातून करण्यात आली आहे. या चार सदस्यीय समितीमध्ये वित्त विभागाचे मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराना आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद आदी सदस्यांचा समावेश होता. या समितीने पर्यायी जागांना भेटी देऊन मेट्रो-३ कारशेडसाठी पर्यायी व्यवहार्य जागांची चाचपणी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -