घरमुंबई१००, १०, ५ रुपयांबद्दल आरबीआयचे स्पष्टीकरण

१००, १०, ५ रुपयांबद्दल आरबीआयचे स्पष्टीकरण

Subscribe

घाबरू नका! जुन्या नोटा चलनातच राहणार

रिर्झव्ह बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक बी. महेश यांच्या एका वक्तव्याच्या आधारावर शनिवारी माध्यमांमध्ये एक बातमी वेगाने पसरली. रिझर्व्ह बँक लवकरच 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेणार असल्याची ही बातमी आहे. माध्यमांमध्ये पसरलेल्या या बातमीवर आता रिझर्व्ह बँकेने एक स्पष्टीकरण दिले आहे. असा कुठलाही निर्णय घेतला गेला नाही, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. पीआयबीने त्याबाबत एक ट्विट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत आणि ते चलनात कायम राहतील. सध्या या नोटा चलनातून बाहेर करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलनंतरही 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटाही बाजारात सुरू राहतील. दरम्यान आरबीआयकडून 5, 10 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. बाजारात सध्या नव्या आणि जुन्या नोटा चालू आहेत.

बाजारात सर्व नव्या नोटा उपलब्ध

नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडून 2000, 500, 200, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आताही जुन्या नोटा वैध आहेत आणि त्या चलनातही आहेत. रिझर्व्ह बँकेकडून 5 जानेवारी 2018 ला 10 ची नोट जारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये 100ची नवी नोट जारी करण्यात आली होती. त्याचबरोबर 20 रुपयांची नवी नोटही चलनात आणली. तर 50 ची नवी नोट 18 ऑगस्ट 2017 ला जारी करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2017 ला 200 रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली होती. नोटबंदीनंतर लगेच 10 नोव्हेंबर 2016 ला 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. त्याच दिवशी 2000 रुपयांची नोटही जारी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -