घरमुंबईयोग्य निदानामुळे वाचली शस्त्रक्रिया; १५ वर्षीय मुलीला दुर्मिळ जीआय ट्रॅक्ट व्हायरल इन्फेक्शन

योग्य निदानामुळे वाचली शस्त्रक्रिया; १५ वर्षीय मुलीला दुर्मिळ जीआय ट्रॅक्ट व्हायरल इन्फेक्शन

Subscribe

जसलोक हॉस्पिटलमध्ये योग्य निदानामुळे एका १५ वर्षीय मुलीची शस्त्रक्रिया वाचली आहे.

मुंबईतील एका १५ वर्षीय मुलीच्या आजाराचं योग्य निदान झाल्यामुळे तिला शस्त्रक्रियेपासून सुटका मिळाली आहे. या मुलीला अपेंडिसीटीसच्या निदानामुळे जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण, योग्य वेळी तिचा सीटी स्कॅन आणि इतर रक्त तपासणी केल्या गेल्या. त्यामध्ये अपेंडिक्स नसून शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं डॉक्टरांकडून सुचवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय बरं करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

हेही वाचा – डॉ. पायल तडवी प्रकरणापूर्वी नायरमध्ये ४ विद्यार्थ्यांचे रॅगिंग

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टन्ट जनरल सर्जरी डॉ. अभिजीत ठाकूर यांनी सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी तीव्र अपेंडिसीटीसच्या निदानासाठी एक १५ वर्षांची मुलगी दाखल झाली होती. पण, तपासणी केल्यानंतर या मुलीला मेसेंटरिक लिम्फडायनायटिस असल्याचे दिसून आले. ज्यात तिच्यावर शस्त्रक्रिया न करता हा आजार बरा करता येऊ शकतो असं कळलं. लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांच्या शस्त्रक्रियेआधी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते. लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांएकाची शस्त्रक्रिया करण्याआधी विचार आणि सल्लामसलत करुन घेणं गरजेचं आहे. ”

पोटाच्या तापाची ‘ही’ आहेत लक्षणे

प्रौढांमध्ये पोटाचा ताप फारच सामान्य गोष्ट आहे. पण, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये, काही बाबतीत ते अपेंडिसिसप्रमाणे पोटात वेदना सुरु होतात. सामान्य अल्ट्रासोनोग्राफी आणि सीटी स्कॅन सोप्या रक्त आणि मूत्र चाचणीसह व्हायरल मेसेन्टेरिक लिम्फ ऍडेनाइटिस ओळखता येऊ शकतो. पोटाचा ताप व्हायरस दूषित अन्न, पाणी, प्लेट, भांडी आणि खाण्याद्वारे प्रसारित होतो.

- Advertisement -

या मुलीला मेसेंटेरिक लिम्फ नोड सूज या आजाराचं निदान झालं होतं. ही सूज सामान्यत: तीव्र अप्पेन्डिसीटीस सारखी असते. ज्यात पोटामध्ये दुखणं, ताप येणं आणि उलटी यांसारखी लक्षणे जाणवतात. खऱ्या अपेंडिसिटीसला शस्त्रक्रियेची गरज असते आणि व्हायरल मेसेन्टेरिक लिम्फ नोड सूज या आजाराला शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिसला बहुतेक वेळा “पोटाचा ताप” असे म्हणतात, तो पोट आणि आतड्याचा विषाणूजन्य संसर्ग आहे. पोटाच्या तापाची लक्षणे डायरिया, उलट्या, पोटात दुखणे आणि मळमळ किंवा बरे न वाटणे. किशोरवयीन मुलांमध्ये पोटाचा ताप किंवा व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस आंतरीच्या रसग्रंथीचा दाह होणे किंवा लिम्फ नोड्सला सूज येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -