घरमुंबईशीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

Subscribe

पीडित तरुणी विक्रोळी येथे राहते. नालासोपारा येथील नायगाव येथे राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

नालासोपाऱ्यामध्ये एका १८ वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा धक्कादायक घटना घडली आहे. शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणी विक्रोळी येथे राहते. नालासोपारा येथील नायगाव येथे राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन वाळीव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथे राहणारी पीडित तरुणीची बहीण नालासोपाऱ्यातील नायगाव येथे राहते. बहिणीने २२ मे रोजी पीडितेला नायगाव येथील तिच्या घरी बोलावले होते. त्यानुसार पीडित तरुणी नायगाव येथे गेले. दरम्यान, तिच्या बहिणीने तिला नायगाव येथील रिक्षा स्टँडजवळ अबलोन नावाचा तरुण गाडी घेऊन घेण्यास येईल असे सांगितले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात अबलोन पीडितेला घेण्यासाठी आला.

- Advertisement -

दरम्यान, पीडितीने बहिणीची विचारणा केली असता त्याने ती बीचवर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पीडितेला गाडीमध्ये बसवून बिचकडे नेताना शीतपेय प्याला दिले. त्या शीतपेयामध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. पीडिता बेशुध्द पडल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आपल्यासोबत घडलेली सर्व आपबिती तिने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिच्या सांगण्यावरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण तपासासाठी वालीन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -