घरमुंबईबेस्ट कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

बेस्ट कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

Subscribe

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेणार आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून उद्या परळच्या मित्रधाम सभागृह येथे संघर्ष मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात संपाची पुढली रूपरेषा ठरविण्यात येणार आहेत.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी २०१९ च्या सुरुवातीस तब्बल ८ दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संप झाला होता. हा संप हायकोर्टाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकादा बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीला लागले आहेत.

- Advertisement -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • बेस्टचे अस्तित्व राखण्यासाठी बेस्ट उपक्रमासाठी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या “क” अर्थसंकल्पाचे “अ” अर्थसंकल्पात विलानीकरण करण्यासाठी मजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करा.
  • एप्रिल, २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना समपातळीवर आणण्यासाठी उर्वरित दहा वेतनवाढी तात्काळ लागू करा.
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणी पत्रावर चर्चा सुरू करून तातडीने वेतन करार करा.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकित कायदेशीर देणे देणे तात्काळ रद्द करा.
  • विद्युत विभागातील कॅज्युअल कामगारांना तातडीने कायम करा, ग्रॅज्युइटी ठरविताना कॅज्युअल सेवेचा काळ गृहीत धरून देणी द्या.

अशा प्रमुख्य मागण्या घेऊन बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात संपाविषयी चर्चा करून संपाची दिशा ठरवणार असल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून देण्यात आली आहे. या संबंधित एक पोस्टर देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकादा मुंबईतील बेस्ट कर्मचारी संपाचे हत्यार उपसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -