घरमुंबईठाण्यात २६ कोटी रूपयांची गुंतवणूक

ठाण्यात २६ कोटी रूपयांची गुंतवणूक

Subscribe

महावितरण वीज यंत्रणेचा प्रकल्प

वीज यंत्रणेच्या विकासासाठी इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आयपीडीएस) अंतर्गत ठाणे सर्कलसाठी २६ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महावितरणच्या वीज यंत्रणेतील सुधारणेच्या कामांतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडळा अंतर्गत ठाण्याच्या तिन्ही सर्कलसाठी विद्युत यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाण्यात आयपीडीएस योजनेअंतर्गत रिनोव्हेशन आणि मॉडर्नायझेशनचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत लघुदाब वाहिन्या, विजेचे खांब आणि रिंगमेन युनिट अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील वीज ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध होईल. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारीही कमी होतील. महावितरणदेखील या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे जीर्ण झालेली यंत्रणा तसेच कालबाह्य झालेली विजेची यंत्रणा अद्ययावत होण्यासाठी मदत होईल.

- Advertisement -
८७ हजार मीटर बदलले

महावितरणच्या यंत्रणेत रोलेक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांचे मीटर ८७ हजार ग्राहकांच्या घरात बसवण्यात आले होते. पण या विजेच्या मीटरमध्ये दोष आढळला. मीटरचे रिडिंग धीम्यागतीने होत असल्याने महावितरणला तोटा झाला. महावितरणने या दोन्ही कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या आहेत. त्यामुळेच ठाणे जिल्ह्यात या कंपनीचे ८७ हजार मीटर बदलण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -