घरमुंबई२ एप्रिल - जागतिक ऑटीझम दिन

२ एप्रिल – जागतिक ऑटीझम दिन

Subscribe

गरोदरपणात काळजी न घेतल्याने ऑटीझम होतो. ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे.

ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी डॉक्टर, पालक आणि समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्विकार करुन या मुलांना समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी २ एप्रिल या दिवशी जागतिक आत्ममग्नता म्हणजेच ऑटीझम दिन पाळला जातो. आपल्या समाजामध्ये आजही आत्ममग्नता मुलांना सन्मानाने वागवले जात नाही. ऑटिझम म्हणजे नेमकं काय ते माहीत नसल्यामुळे अशा मुलांना अनेकवेळा ‘गतिमंद’ समजले जाते. पण, गतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे. मूल २ ते ३ वर्षांचं होईपर्यंत त्याच्या पालकांनाही स्वमनगणेबाबत कल्पना नसते. कधी कधी तर ८-१० वर्षांपर्यंतही काहीही लक्षात येत नाही. त्यामुळे गर्भवती असताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

काय आहे ऑटिझम

ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे आणि वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या आजाराविषयी अधिक माहिती देताना स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असलेल्या बालविकास तज्ञ डॉ. अंजना थडानी सांगतात, “ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक काम मानले जाते. गतिमंद मुलांचा बुद्धय़ांक सरासरीपेक्षा कमी असतो तर ऑटिझमग्रस्त मुलांचा बुद्ध्यांक सरासरी म्हणजे सत्तरच्यावर असू शकतो. पाच टक्के मुलांचा सरासरीहून अधिक म्हणजे शंभरपर्यंत असू शकतो. परंतु त्या मुलांना स्वतःला व्यक्त करता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते.”

- Advertisement -

काय आहेत लक्षण

स्पीच थेरपी, फिजिओ थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स ड्रामा थेरपीचा वापर करावा लागतो. शैक्षणिक विकास पद्धती, कल्पकतेचा वापर करुन शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरित्या सक्षम करण्यासाठी होऊ शकतो. मुलांमध्ये ऑटिझमच्या समस्येबाबत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या बालरोगतज्ञ आणि निओनॉलॉजिस्ट डॉ. मनीषा शिरोडकर सरदार सांगतात, ” जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली आणि तणावाचे प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरु शकते. गरोदरपणाच्या काळात काही औषधांचे सेवन हेही ऑटिझमच्या कारणांपैकी एक कारण असू शकते. सतत ताप येत असेल, अचानक फ्लूची लागण होत असेल तर किंवा कुठलेही अँटिबायोटिक्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ”
संपूर्ण जगात ७ करोडहून अधिक स्वमग्न नागरिक आहेत आणि यातील एक करोडहुन अधिक नागरिक ( यात लहान मुलांचा समावेश आहे ) भारतामध्ये आहेत.

मुंबईत ६८ पैकी एका मुलाला ऑटिझम असल्याचा धक्कादायक अहवाल फोरम फॉर ऑटिझम या संस्थेकडून मिळाला आहे. यानुसार, मुंबईत २.७२ करोड व्यक्तींना ऑटिझम असल्याचंही फोरम फॉर ऑटिझम या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -