घरमुंबईकल्याणमध्ये हॉस्पिटलचा असंवेदनशीलपण, ४ वर्षीय बाळाचा मृत्यू!

कल्याणमध्ये हॉस्पिटलचा असंवेदनशीलपण, ४ वर्षीय बाळाचा मृत्यू!

Subscribe

कल्याणातील एका हॉस्पिटलचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. एका ४ वर्षीय बाळाला उपचारासाठी रूग्णालयात हॉस्पिटल तेथल्या डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला दुसर्‍या रूग्णालयात नेण्यास सांगितले. तसेच रूग्णालयाने गेटही लावून घेतले. या सगळ्या गदारोळात एक तास गेल्याने त्या बाळाला जीव गमवावा लागल्याचा ह्दयद्रावक घटना घडलीय. गेल्या तीन वर्षापासून त्या बाळाची याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू असतानाही हॉस्पिटलच्या असंवेदनशील प्रकारबद्दल बाळाच्या आई- वडीलांनी आणि प्रत्यक्षदर्शीनी चीड व्यक्त केली आहे. माझ्या मुलाचा जीव परत येऊ शकत नाही, पण दुसर्‍या मुलाच्याबाबतीत तरी असे घडू नये असे… त्या बाळाचे वडील अरूण वर्मा यांनी डोळयातील अश्रूंना वाट करून देत ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं.

कल्याणातील चिचंपाडा परिसरात अरूण वर्मा हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचा ४ वर्षीय मुलगा आदित्य कुमार याला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी सकाळी अचानक आदित्य रडायला लागला. रडणे थांबत नसल्याने आईने त्याला काटेमानिवली परिसरातील स्पर्श या लहान मुलांच्या रूग्णालयात आणले. त्याच परिसरात राहणारे जितेंद्र भोईर यांच्या रिक्षात बसून ते हॉस्पिटलला आले. आदित्यची डॉक्टरांनी तपासणीही केली नाही. त्याला दुसर्‍या हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. माझ्या मुलाची तपासणी करा, अशी आई सांगत होती. पण कोणीच ऐकले नाही. हॉस्पिटलच्या स्टाफने गेटला टाळे लावून घेतले. या सगळया प्रकारात तासभर गेल्यानंतर अखेर रिक्षा चालक भोईर यांनी त्या आई वडीलांना धीर देत बाळाला घेऊन ते केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात गेले.

- Advertisement -

तिथल्या डॉक्टरांनी आदित्यकुमारची तातडीने तपासणी केली. मात्र आदित्यला आणण्यात एक तास उशीर झाल्याचे सांगून, डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तातडीने उपचार केले असते, तर माझा मुलगा वाचला असता. पण डॉक्टरांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत असा आरोप आदित्यची आई वंदना वर्मा यांनी केला. माझ्या दोन्ही मुलांची लहानपणापासून स्पर्श हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू आहे, असे असतानाही त्याच्यावर तातडीने उपचार केले नाही. आमची परिस्थिती गरीब असतानाही महागडे हॉस्पिटल असतानाही दोन्ही मुलाची आम्ही तिथेच ट्रीटमेंट ठेवली. पण हॉस्पिटलच्या घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आदित्यचे वडील अरूण कुमार हे गॅरेज मॅकेनिक आहेत. त्यांना ३ वर्षाची जान्हवी ही मुलगी आहे. आदित्यच्या अकाली मृत्यूने वर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शनिवारी सकाळी बाळ खेळत होते, मात्र अचानक रडायला लागला, त्याचे रडणे थांबत नव्हते. त्यानंतर तो एकदम शांत झाला. आम्ही तातडीने जवळच्या स्पर्श हॉस्पिटला नेले. पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला साधे तपासले सुध्दा नाही. बाळाला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. आम्हाला हॉस्पिटलच्या आतमध्येसुध्दा घेतले नाही. गेटला टाळे लावून घेतले. जीवन मरण कुणाचाही हातात नाही. पण हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला तपासणे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे.पण असे काहीच केले गेले नाही याचे दु:ख वाटत आहे.
-वंदना वर्मा , मृत आदित्यकुमारची आई

- Advertisement -

माझ्याच रिक्षात त्या बाळाला घेऊन काटेमानिवली येथील स्पर्श रूग्णालयात नेले होते. तिथल्या डॉक्टरांनी त्या बाळाला साधे तपासले नाही आणि हॉस्पिटलच्या गेटला टाळ लावले ही सत्य परिस्थिती आहे. मी बाळाच्या आई-वडीलांना धीर देत होतो. अखेर आम्ही त्या बाळाला पालिकेच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली पण एक तास उशिर झाल्याने मृत घोषित केले. बाळाला लगेच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकलो असतो. कोणत्याही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अशा प्रकारे वागणे योग्य नाही.
-जितेंद्र भोईर, रिक्षाचालक आणि अण्णा हजारे समर्थक कार्यकर्ता

हे बाळ हॉस्पिटलआणले होते, तेव्हा आरएमओ डॉक्टरांनी त्याला चेक केले होते. त्यावेळी तो मृत झाला होता. त्यामुळे त्याच्यावर काहीच उपचार करू शकत नव्हतो. हॉस्पिटलआलेल्या प्रत्येक बाळाची तपासणी केली जाते. त्यासाठी २४ तास डॉक्टर असतात. पेशंटला चेक न करता पुढे पाठवले गेले असे कधीच होत नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये सिरीअस पेशंट सातत्याने सुरू असतात. पण ज्या पेशंटला आपण सुविधा देऊ शकत नाही, त्या पेशंटला आपण दुसरीकडे जाण्यास सांगतो. त्यामुळे चुकीचे काही घडलेले नाही.
-डॉ आशिष पाटील, स्पर्श हॉस्पिटल, कल्याण.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -