घरमुंबईमुंबईत बसवणार ४० भूमिगत कचरा पेट्या

मुंबईत बसवणार ४० भूमिगत कचरा पेट्या

Subscribe

१० लाख रुपयांची एक कचरा पेटी

तब्बल आठ महिन्यांपूर्वी मुंबईत चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर भूमिगत कचरा पेटी बसवण्यात आल्यानंतर आता मुंबईतील २० प्रभागांमध्ये एकूण ४० भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार आहेत. २.२ घनमीटर क्षमतेचे हे कचरा डबे असून यासाठी सुमारे सव्वा चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एका भूमिगत कचरा पेटीसाठी महापालिका १० लाख रुपये मोजणार आहे.

मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे डबे ठेवण्यात आले आहेत. या उघड्यावर ठेवण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे उग्रवास आसपासच्या परिसरात पसरतो. तसेच कचरा उघड्यावर असल्याने बर्‍याच ठिकाणी मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून कचरा पेट्यांतून कचरा बाहेर फेकला जातो. त्यामुळे कचरा पेट्यांचा परिसर अस्वच्छ होतो, शिवाय या कचर्‍यामुळे पादचार्‍यांनाही चालताना अडचणी येत असतात. या तुलनेत भूमिगत कचर्‍याचे डबे जमिनीखाली बसवल्यास यामुळे कचर्‍यापासून होणारी दुर्गंधी कमी होईल. तसेच पादचार्‍यांना कचरा पेट्यांजवळून जातानाही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून जो कचरा अस्ताव्यस्त टाकला जातो, त्यावर नियंत्रण येवून आरोग्य चांगले जाईल, या हेतूने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या विभागात प्रत्येकी एका ठिकाणी अशा एकूण चार ठिकाणी आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवले. ग्रँटरोड येथील या भूमिगत कचर्‍याच्या डब्याचे लोकार्पण फेब्रुवारी महिन्यात युवासेना अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते झाले होते.

- Advertisement -

३ महिन्यांत बसवणार आधुनिक कचरा पेट्या
चार ठिकाणी बसवण्यात आलेल्या या भूमिगत कचरा पेट्यांच्या यशस्वी प्रयोगानंतर आता महापालिकेच्या उर्वरीत २० विभागांमध्ये ४० ठिकाणी आधुनिक स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे कचरा डबे बसवण्यात येत आहेत. यासाठी मॅक इन्वायरोटेक एण्ड सोल्युशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे १० लाख रुपयाला एक कचरा पेटी खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे ४० भूमिगत कचरा पेट्यांसाठी ४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये या कचरा पेट्या बसवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -