घरमुंबईविसर्जनाच्यावेळी बेपत्ता झालेल्या साईशचा मृतदेह सापडला

विसर्जनाच्यावेळी बेपत्ता झालेल्या साईशचा मृतदेह सापडला

Subscribe

लालबाग राजाच्या विसर्जनाच्यावेळी बेपत्ता झालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला

लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटल्याची घटना घडली होती. या बोटमध्ये पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी दोन जणांना सुखरुप बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान साईश मर्दे (५) हा चिमुरडा बेप्पता झाल्याची माहिती समोर आली होती. हा मुलगा नायर रुग्णालयातून बेप्पता झाला असल्याचे साईशच्या कुटुंबियांने देखील सांगितले होते. त्यावेळी अनेक विविध अफवांनाही उधाण देखील आले होते. मात्र आज या चिमुरड्याचा मृतदेह सापडला आहे. पाच दिवसांनी या चिमुरड्याचा राजभवन येथील समुद्र किनारी मृतदेह सापडला असल्याने साईशच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

नेमके काय घडले?

लालबाग राजाच्या बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या लालबाग राजाला निरोप देण्यासाठी आणि त्याचे विसर्जन पाहण्यासाठी अनेक भक्त विविध ठिकाणातून येत असतात. मर्दे हे कुटुंब देखील पालघर वरुन लालबाग राज्याचे विसर्जन पाहण्यासठी आले होते. साईशचा मामा लालबाग येथे राहत असल्याने या कुटुंबांने तेथेच मुक्काम केला होता. मर्दे हे कुटुंब लालबाग राजाचे विसर्जन पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गेले होते. या कुटुंबासोबत त्यांचा मुलगा साईश मर्दे देखील त्यांच्यासोबत होता. लालबाग राजाचे विसर्जन पाहण्यासाठी हे कुटुंब विसर्जनाच्या बोटीमधून गेले होते. मात्र अचानक ही बोट उलटली. त्यापैकी दोन जणांना सुखरुप बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये काजल मेयर (३१) आणि अवनी (५) या चिमुरडीचा समावेश असल्याची माहिती समोर आली. तर इतर तीन जणांना वाचवण्यात देखील यश आले. यामुळे लालबाग राजाच्या विसर्जनाच्यावेळी मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे सांगण्यात आले.

- Advertisement -

शेवटी अनर्थ घडला

लालबाग राजाच्या विसर्जनाच्या त्याच दिवशी साईश मर्दे (५) हा चिमुरडा बेप्पता झाला असल्याची माहिती समोर आली. साईश आपल्या आई आणि बहिणीसोबत लालबाग राजाच्या तराफासोबत असलेल्या कोळी बांधवाच्या एका बोटीतून गेला होता. त्यादरम्यान बोट बुडाली आणि त्यानंतर साईश बेप्पता असल्याचे समोर आले. तसेच माझा मुलगा बोटीत होता आणि त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असावे असा अंदाज त्याच्या आईने व्यक्त केला होता. तर आपला मुलगा नायर रुग्णालयातून बेप्पता झाला आहे असे देखील त्याच्या आईने सांगितले. बोट उलटल्यानंतर साईशचा शोध घेण्यास सुरुवात झाली. साईश बेप्पता झाल्यापासून नौदल, तटरक्षक दल, हवाई दल त्याचा शोध घेत होते. अखेर आज पाच दिवसांनी साईशचा मृतदेह सापडला आहे. साईशच्या टी – शर्टवरुन या चिमुरड्याची ओळख पटली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -