घरमुंबईसुप्रसिद्ध हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे निधन

सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे निधन

Subscribe

आपल्य संवादिनी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. पंडित बोरकर यांना हार्नियाचा त्रास झाला होता. त्यावर उपचार केल्यानंतर ते बरे झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास सुरु झाला. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर क्षयरोगाचे निदान करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बोरकर यांच्या निधनामुळे एक ज्येष्ठ हार्मोनियमवादक हरपल्याची भावना संगीत विश्वातून प्रकट केली जात आहे. पं. बोरकर यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत.

तुळशीदास बोरकर यांचा अल्पपरिचय

तुळशीदास बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ मध्ये गोव्यातील बोरीमध्ये झाला होता. ५० हून अधिक वर्षे त्यांनी कलाकारांबरोबर शास्त्रीय गायन मैफलीत साथ दिली. स्वतंत्र हार्मोनियमवादनात त्यांनी जपलेले वेगळेपण हे कायम लक्षात राहण्यासारखे आहे. नाट्यसंगीतातील लक्षणीय त्यांचे ऑर्गनवादन अनेकांना आकर्षित करत असे. पं. तुळशीदास बोरकर हे मूळचे गोव्यातील बोरी गावचे होते. त्यांचे चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण बोरीमध्ये झाले, तर पुढचे शिक्षण सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये झाले.

- Advertisement -

बोरी गावातल्या नवदुर्गा मंदिरात बालपणी कीर्तन आणि प्रवचन करता करताच त्यांच्यावर हार्मोनियमचे संस्कार झाले. त्यांच्या आई जयश्री या गायक होत्या, तसेच त्या नाटकातूनही काम करायच्या. तर मोठी बहीण नलिनी बोरकर या कलाविकास नाट्य संस्थेत काम करत होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच ते घडत गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -