घरमुंबई६०% नागरिक झोपतात फक्त ५ तास ; बळावतोय मेंदुविकार

६०% नागरिक झोपतात फक्त ५ तास ; बळावतोय मेंदुविकार

Subscribe

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात पण, अपुरी झोप हे प्रमुख कारण आहे. अनेक नागरिक झोपेच्या गोळ्या, सिरप आणि वेदनाशामक गोळ्यांचा आधार घेतात यातून अनेकवेळा मेंदूविकार वाढू शकतात.

अपुऱ्या झोपेमुळे नागरिकांमध्ये मेंदुविकारांचे प्रमाण वाढत आहे. मेंदूविकार आणि संबंधित आजार वाढण्यास नागरिकांच्या बदललेली जीवनशैली तसंच अपुऱ्या झोपेच्या समस्या वाढत असल्याचं निरीक्षण बोरीवलीच्या अपेक्स हॉस्पिटल समूहाने केले आहे. अपेक्स हॉस्पिटल समूहाने गेल्या सहा महिन्यात २०० नागरिकांमध्ये एका वैद्यकीय संशोधनाद्वारे केलेल्या एका निरीक्षणात ही बाब समोर आली आहे. डोकेदुखी, अर्धशिशीर, फिट, आकडी, लकवा, पक्षाघात, न्युरोपथी, हातापायांना मुंग्या येणं, मानेचं आणि कंबरेचं दुखणं, स्मृतीभ्रंश, कंपवात अशा मेंदूशी निगडीत असलेल्या आजारांच्या रुग्णांचं सर्वेक्षण केलं गेलं.

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मेंदूविकार तज्ञ डॉ. समीर पारीख यांनी सांगितलं की, ” हॉस्पिटलतर्फे सहा महिन्यात अंधेरी ते दहिसर या विभागात घेतलेल्या आरोग्य शिबिरात मेंदूविकार संबंधित अनेक रुग्णांमध्ये अपुरी झोप ही समस्या ५० ते ६० टक्के रुग्णांमध्ये आढळून आली. “

डोकेदुखीची कारणे

डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात पण, अपुरी झोप हे प्रमुख कारण आहे. अनेक नागरिक झोपेच्या गोळ्या, सिरप आणि वेदनाशामक गोळ्यांचा आधार घेतात यातून अनेकवेळा मेंदूविकार वाढू शकतात. कमी झोपेमुळे बिटा अमाइलॉइड प्लॅक (Beta–amylaid Plaque) म्हणून ओळखल्या जाणा-या मेंदूतील अनावश्यक प्रोटीनची वाढ होते. वारंवार तोल जाणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी ही सर्वसाधारण वाटणारी लक्षणंही मेंदूच्या गंभीर आजाराची असू शकतात. झोपेत मेंदू हार्मोन्स, एन्झाइम्स आणि प्रथिनांचे संतुलन राखतो. मेंदूला श्वास घेण्यासाठी झोप ही एकमेव वेळ असते. झोपल्यावर तुमचा मेंदू पुन्हा पुनर्जीवित आणि ताजा होतो. जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर मेंदू दिवसभर डिस्टर्ब राहिल आणि तुम्हाला विसरण्याचा म्हणजेच अल्झायमर सारखा आजार होऊ शकतो.”

- Advertisement -

३७ टक्क्याने मेंदूविकारात वाढ

लॅन्सेट अहवालानुसार जगभरात १९९० ते २०१५ या काळात ३७ टक्क्यांनी मेंदूविकारात वाढ झाली असून १६ टक्के मृत्यूचे कारण हे मेंदूविकाराशी संबंधित असून भारतामध्ये स्मृतीभंश झालेल्या ७० टक्के जेष्ठ नागरिकांवर योग्य उपचार होत नाहीत. वय झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये हा आजार होतो हा गैरसमज समाजामध्ये असल्यामुळे ते वैद्यकीय उपचारापासून लांब राहतात.

भारताची सद्यपरिस्थिती

भारतातही मेंदूविकार रुग्णांची संख्या वाढत असून ३ करोडहुन अधिक नागरिक मेंदूविकारांशी संबंधित असून यातील फक्त ४० टक्केच रुग्णांवर योग्य उपचार होत आहेत. भारताच्या १ लाख नागरिकांपैकी २४०० नागरिक आकडी, लकवा, पक्षाघात, स्मृतीभ्रंश, कंपवात अशा वेगवेगळ्या मेंदू संबंधित आजाराने त्रस्त आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -