घरमुंबईम्हाडाच्या घराचे आमिष दाखवून 75 लाखांची फसवणूक

म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून 75 लाखांची फसवणूक

Subscribe

म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून सुमारे 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी पाच भामट्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फैयाज अहमद अब्दुल वाहिद शेख हे कुर्ला येथील व्ही. बी नगर, एलआयजी कॉलनीत राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची एका आरोपीशी ओळख झाली होती. या आरोपीने त्याच्या इतर चार सहकार्‍यांच्या मदतीने फैयाज यांना ते म्हाडामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते, म्हाडाच्या लॉटरीमध्ये त्यांना स्वस्तात घर मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून म्हाडाच्या घरासाठी सुमारे 75 लाख रुपये घेतले होते. मात्र तीन वर्षांत त्यांना म्हाडाचा फ्लॅट मिळवून दिला नाही. तसेच म्हाडाने अलोट केलेल्या फ्लॅटचे कागदपत्रेही सादर केले नाही. त्यांनी दिलेल्या पैशांचा या पाचही भामट्यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. वारंवार पैशांची मागणी करुनही ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.

- Advertisement -

या घटनेनंतर त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांत धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध शुक्रवार 22 फेब्रुवारीला अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. लवकरच या पाचही आरोपींची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -