घरमुंबईमहापालिकेच्या आरोग्य विभागात ९ कोटींचा भ्रष्टाचार

महापालिकेच्या आरोग्य विभागात ९ कोटींचा भ्रष्टाचार

Subscribe

सेनेच्या नगरसेवकांचा आरोप

मुंबई महपालिकेचा आरोग्य विभाग राबवत असलेल्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेत तब्बल ९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला. महापालिकेच्या आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कंत्राटी कामगार पुरवणार्‍या एजन्सी आणि कंपनी यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केला असल्याचे सरवणकर यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत म्हटले.

हा भ्रष्टाचार मागील तीन वर्षांत झाला आहे. या भ्रष्टाचारात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, उपआरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची पालिका आयुक्तांनी त्वरित चौकशी करून त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी पालिकेच्या आरोग्य समितीचे उपसभापती सरवणकर यांनी या वेळी केला.

- Advertisement -

काय आहे नेमका आरोप

केंद्राकडून पालिकेच्या आरोग्य अभियानासाठी पालिकेच्या अधिकार्‍यांनी माहिम येथील डि.एस. एंटरप्राइज या एजन्सीची निवड केली. या कंत्राटाच्या मंजुरीला निविदा काढली गेली नव्हती. या अभियानाअंतर्गत मुंबईत काही आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आली. या आरोग्य केंद्रातील कर्मचारी पुरवण्याचा कंत्राटदार डि.एस. एंटरप्राइजला देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, जी.एन.एम., ए.एन.एम, डाटा एंट्री ऑपरेटर, लॅबअटेंडेंट असे कर्मचारी डि.एस. एंटरप्राइजने पुरवले. या कर्मचार्‍यांचा पगार पन्नास हजार, चोदा हजार, दहा हजार, अकरा हजार, सात हजार असा कंत्राटदाराकडून देण्यात येतो.

मुळात पालिका थेट हंगामी कर्मचारी भरती करू शकत असताना आरोग्य अधिकार्‍यांनी एजेंसी मार्फत कर्मचारी घेण्याचा मार्ग का निवडला, असा या आरोग्य अभियानात सेवा बजावत असणार्‍या कर्मचार्‍यांचा सवाल आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या पगारातून पाच हजार कापले जात असल्याचे कंत्राटी कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. अशा प्रकारे वर्षाला नऊ कोटी रूपये डि.एस. एंटरप्राइजच्या कर्मचार्‍यांच्या श्रमाचे पैसे लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालिकेने थेट हंगामी कर्मचारी घेतले असते तर पालिकेच्या तिजोरीत नऊ कोटीची भर पडली असती,अशी माहिती शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -