घरमुंबई१५ वर्षांच्या मुलाने केली ८ वर्षांच्या मुलाची हत्या

१५ वर्षांच्या मुलाने केली ८ वर्षांच्या मुलाची हत्या

Subscribe

अनैसर्गिक अत्याचार करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला,

एका दहा वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना साकिनाका येथे उघडकीस आली आहे. या मुलाच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून जवळच असणार्‍या नाल्यात सुटकेस टाकण्यात आली होती. साकिनाका पोलिसांनी ४८तासात या हत्येची उकल करून १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका कुटुंबातील 8वर्षांचा मुलगा गुरुवारी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाला एका व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून त्याची ’पिग्गी बँक’ घेऊन येण्यास सांगितले होते, असे मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले होते. साकिनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी आपल्या पथकासह त्या अनुषंगाने तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक १५वर्षांचा मुलगा एक मोठी सुटकेस घेऊन जात असताना दिसून आला. पोलिसांना त्यात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. तपास पथकाने या संशयित मुलाचा शोध घेऊन ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र ,काहीवेळाने त्याने हत्येची कबुली दिली.

- Advertisement -

ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा १५ वर्षांचा असून बेपत्ता झालेल्या मुलाच्या घराशेजारी राहण्यास आहे. गुरुवारी दुपारी घरी कोणीही नसताना त्याने घराशेजारी खेळणारा बळीत 8वर्षांच्या मुलाला घरी बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाने आरडाओरड केली म्हणून घाबरलेल्या आरोपीने काही वेळा दोन्ही हाताने त्याचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने घरातील एक सुटकेस काढून बळीत मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आणखी एका मित्राची मदत घेऊन मृतदेह असलेली सुटकेस ९० फूट येथील एका नाल्यात टाकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. साकिनाका पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शनिवारी दुपारी मृतदेह असलेली सुटकेस नाल्यातून बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध अपहरण,हत्या,अनैसर्गिक अत्याचार आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने आईच्या मोबाईलवर असलेली पॉर्न फिल्म बघितली होती. याचा परिणाम होऊन त्याने शेजारी राहणार्‍या 8वर्षांच्या मुलाला घरी कोणी नसताना बोलावले होते.त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. मात्र या बळीत मुलाला असेच सोडले तर घरी जाऊन सांगेल म्हणून आरोपीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली.
– सुनील माने, पोलीस निरीक्षक, साकिनाका पोलीस ठाणे

- Advertisement -

क्राईम पेट्रोल पाहून लावली मृतदेहाची विल्हेवाट
मुख्य आरोपीने 8वर्षांच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने सुटकेसचा वापर केला, घरातील सुटकेस रिकामी करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ती सुटकेस त्याने मित्राच्या मदतीने नाल्यात टाकली होती. हा सर्व प्रकार त्याने क्राईम पेट्रोल ही गुन्हे संबंधी मालिका बघून केला असल्याची कबुली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -