घरमुंबईरिक्षाचालकाने नेले भलतीकडेच; घाबरलेल्या तरुणीने रिक्षातून मारली उडी

रिक्षाचालकाने नेले भलतीकडेच; घाबरलेल्या तरुणीने रिक्षातून मारली उडी

Subscribe

ठाण्यात रिक्षाचालक भलतीकडे नेत असल्यामुळे तरुणीने रिक्षातून उडी मारली.

ठाण्यात दोघी मैत्रिणी कासारवडवली ते नागलाबंदर येथे रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षाचालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवीत दोघी मैत्रीणींना इच्छित स्थळी न उतरविल्याने एकीने घाबरून चालत्या रिक्षातून बाहेर उडी घेतली. त्यामुळे ही तरुणी जखमी झाली.

नक्की काय घडले?

ठाण्यात राहणारे तक्रारदार नामदेव चौगुले रा. घोडबंदर रोड येथे नागला बंदर रोड यांची मुलगी मालन चौगुले आणि तिची मैत्रीण अंजली जेठे या दोघी ४ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षात बसल्या. त्यावेळी रिक्षाचालक कामरान रीयाजुल खान (वय २२ रा.दहिसर) याने भरधाव वेगाने रिक्षा चालवीत दोघी मैत्रीणींना इच्छित स्थळी न उतरविल्याने दोघी मैत्रिणी घाबरल्या. त्या दोघींपैकी मालन हिने चालत्या रिक्षातून उडी घेतली. त्यात ती जखमी झाली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -