घरमुंबईपाणीपट्टी दरवाढ, बेस्ट वीज ग्राहकांकडून अनामत रक्कम वसुली अन्यायकारक; आपकडून आंदोलनाचा इशारा

पाणीपट्टी दरवाढ, बेस्ट वीज ग्राहकांकडून अनामत रक्कम वसुली अन्यायकारक; आपकडून आंदोलनाचा इशारा

Subscribe

मुंबई  -: मुंबई महापालिकेने पाणी दरात पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेली ७.१२ टक्के दरवाढ आणि बेस्ट वीज विभागाने ग्राहकांकडून दोन महिन्यांच्या वीज बिल रूपाने अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करण्याबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. या दोन्ही निर्णयांना आम आदमी पार्टीचा तीव्र विरोध आहे. मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रमाने ही दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास आम आदमी पार्टी २८ डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रिती शर्मा मेनन यांनी दिला आहे.

मुंबईला पालिकेतर्फे जो काही दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. तो अपुरा आहे. पालिकेने पाणीपुरवठयात कोणतीही वाढ केलेली नाही. असे असताना पालिकेने पाणीपट्टी दरात ७.१२ टक्के एवढी दरवाढ केली आहे. तसेच, ही दरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने जून २०२२ पासून लागू करणे चुकीचे आहे. अगोदरच इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे मुंबईकर आणि गरीब जनता त्रस्त आहेत. त्यात पाणीपट्टी दरात इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करणे अन्यायकारक आहे.पालिकेचा हा पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय अन्यायकारक असल्याचे सांगत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रिती शर्मा मेनन यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

खरे तर मुंबईकरांना मुबलक आणि शुद्ध पाणी मोफत मिळाले पाहिजे. कारण की, मुंबई महापालिका सध्या कोट्यवधी रुपयांनी नफ्यात आहे. मुंबई महापालिका ही आशियातील खंडातील सर्वात मोठी व श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ४६ हजार कोटींच्या घरात आहे तसेच, मुंबई महापालिकेच्या विविध बँकांत तब्बल ९२ हजार कोटींची फिक्स डिपॉझिट स्वरूपात गुंतवणूक आहे. त्यातून पालिकेला मोठ्या प्रमाणात व्याज मिळत आहे. असे असताना पालिजेने आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईकरांवर पाणीपट्टी दरवाढ लादणे चुकीचे व अन्यायकारक आहे. पालिकेला पाणी गळती रोखणे व पाणी माफियांना रोखणे यात अपयश आले आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया देत प्रीती शर्मा मेनन आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास यांनी पाणी दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

तसेच, बेस्टने वीज ग्राहकांवर दोन महिन्यांच्या वीज बिलाची रक्कम अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम म्हणून वसूल करण्याबाबत काढलेले फर्मान त्वरित रद्द करावे, अशी मागणीही प्रिती शर्मा मेनन आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास यांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी दरवाढ व बेस्टने दोन महिन्यांच्या वीज बिल रूपाने अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करण्याबाबत घेतलेला निर्णय या विरोधात २८ डिसेंबर रोजी बेस्टच्या कुलाबा येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. प्रिती शर्मा मेनन आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास यांनी रस्त्यावर उतरून हे जोरदार आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.


महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांची नावं आमच्याकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -