घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, बाहेर येताच सत्तारांनी दिली प्रतिक्रिया...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, बाहेर येताच सत्तारांनी दिली प्रतिक्रिया…

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाशिम जिल्ह्यातील गोचरणाची 150 कोटींची सरकारी जमीन अब्दुल सत्तारांनी लाटल्याचा आरोप पवारांनी केला. यावेळी अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर विरोधकांनीही सभागृहात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना फोन लावला. फोन लावल्यानंतर चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार प्रसार माध्यमांसमोर अवतरले.

अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर लागलेल्या सर्व आरोपांना विधानसभेत उत्तर देईन. त्यामुळे विधानसभेत उद्या बाजू मांडण्यासाठी उत्तराचं ड्राफ्टींग सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडणार असल्याचंही सत्तार यांनी सांगितलं.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांवर आरोप काय?

सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. तर या सर्व प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तार यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ मंत्री अब्दुल सत्तार यांनीही भूखंड वाटपात चूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हेही प्रकरण न्यायालयात गेले आहे. मंत्री सत्तार यांच्यावर अनियमिततेचा फटका ठेवत न्यायालयाने सत्तार यांना नोटीस बजावली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…

आपण जो मुद्दा मांडलात त्याची जरुर माहिती घेतली जाईल. ती माहिती घेऊन वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडू. सिल्लोड महोत्सवासंदर्भात जे मुद्दे मांडले आहेत त्याची गंभीर दखल शासन घेईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे उद्या विधानसभेत अब्दुल सत्तार काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : अब्दुल सत्तारांच भूखंड वाटपात चुकलंच; हायकोर्टाने फटकारले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -