घरमुंबईलेटलतिफ शिक्षक ताळ्यावर

लेटलतिफ शिक्षक ताळ्यावर

Subscribe

महानगर इम्पॅक्ट

शहापूर पंचायत समिती अंतर्गत कसारा परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षक कामाच्या वेळा पाळत नसल्याच्या आशयाची बातमी आपलं महानगरमध्ये छापली होती. या बातमीची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याविषयी कार्यवाही करण्याचे दिले होते. त्यानंतर शिक्षकांचे शाळेत उशिरा येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जवळपास तासभर आधीच शिक्षक शाळेत उपस्थित असल्याचे चित्र आहे.

शिक्षक शाळेत वेळेवर येत नसल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याची बातमी आपलं महानगरमध्ये प्रसिद्ध झाली होती. शिक्षकांची वाट पाहत विद्यार्थी वर्गाबाहेर बसल्याचे चित्र होते. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देऊन विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुकांना पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले आहे. या बातमीचा परिणाम संपूर्ण शहापूर तालुक्यात झाल्याने शिक्षण विभाग याबाबत काय कार्यवाही करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -