घरमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयाचं सयाजी शिंदेंकडून कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं सयाजी शिंदेंकडून कौतुक

Subscribe

मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतानाच सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आरे मधील वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सहकार्य करण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या वृक्षप्रेमाबद्दल राज्यातील सर्वांनाच आतापर्यंत माहिती आहे. विविध मोहिमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणार्थ वृक्षलागवड करणारे सयाजी शिंदे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाचे कौतुक केले आहे. तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रोच्या कारशेडला दिलेली स्थगिती. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतानाच सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आरे मधील वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सहकार्य करण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली आहे.

वृक्षलागवडीचे आवाहन

पुढील आदेशापर्यंत आरे कॉलनीतील एक पानही तो़डू देणार नाही. असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. या निर्णयाचे अभिनेता सयाजी शिंदे यांनी कौतुक केले आहे. एवढेच नाही तर दर रविवारी आरे मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात ज्या कोणाला सहभागी व्हायचे आहे त्याने स्वतः ५ झाडं सोबत आणून वृक्षलागवड करावी, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरुन ‘भाजप’ गायब

उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत

आरे येथील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगितीचे आदेश देत नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही असे विधान केले होते. दरम्यान मेट्रोला विरोध नसून वृक्षतोडीला आहे, असेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे म्हणाले की, “आरेमध्ये कारशेड व्हावं किंवा होऊ नये, मेट्रो व्हावी की नाही हा शासनाचा निर्णय आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जाऊ नयते. उद्धव ठाकरे यांच्या आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, या विधानाचं आम्ही महाराष्ट्रातील झाड लावणाऱ्यांच्यावतीने स्वागत करतो, असं देखील ते म्हणाले.

हेही वाचा – भाजप खासदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे देवेंद्र फडणवीसांकडून खंडन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -