घरमुंबईधमकी देणाऱ्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसलेंचा समावेश - सदावर्ते

धमकी देणाऱ्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसलेंचा समावेश – सदावर्ते

Subscribe

राज्य सरकरानं ७२ हजार राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मेगाभरतीचा विचार करावा. राज्य सरकरनं मागास प्रवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणावरील अहवाल जाहीर करण्याबाबतही विचार करावा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे.

मराठा आरक्षणाविरोधात कोर्टामध्ये धाव घेतलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आज मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हायकोर्टाच्या बाहेर हल्ला करण्यात आला. जालन्याच्या वैजनाथ पाटील या तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतेले आहे. याबद्दल हायकोर्टाच्या न्यायाधिशांसमोर माहिती देताना सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत. मला धमकी देणाऱ्यांमध्ये उदयनराजे भोसलेंचा समावेश असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. या आरोपाची दखल घेत कोर्टाने सदावर्ते यांना पोलीस सुरक्षा देण्याचे आदेश पोलिसांना केले आहे.

मेगाभरतीचा विचार करावा

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दा न्यायप्रविष्ठ असताना सर्वसामान्य अर्जदाराचा अपेक्षाभंग होऊ देऊ नका अशी सूचना हायकोर्टाची राज्य सरकारला दिली आहे. राज्य सरकरानं ७२ हजार राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मेगाभरतीचा विचार करावा. राज्य सरकरनं मागास प्रवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणावरील अहवाल जाहीर करण्याबाबतही विचार करावा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. दरम्यान, १९ डिसेंबरला होणा-या पुढील सुनावणीत राज्य सरकारच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून वाईट वागणुक

तसंच, मला पोलीस वाईट वागणुक देत आहेत. माध्यमांशी बोलण्यास मनाई करत आहेत. तसंच त्यांनी आपला छळ केला असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आङे. तर तरुणाला मारहाण करणाऱ्या वकिलांचा निषेध करत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मराठा नेते डॉ. बाळासाहेब सराटे आणि नानासाहेब कुटे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -