घरमुंबईशेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका - कृषीमंत्री अनिल बोंडे

शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका – कृषीमंत्री अनिल बोंडे

Subscribe

राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार डोक्यात आणू नये, असे आवाहन केले आहे.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यातच अद्याप मान्सूनच्या पावसाचाही पत्ता नाही. यामुळे राज्यातील शेती संकटात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार डोक्यात आणू नये, असे आवाहन केले आहे. पाऊस नसल्याने सध्याची परिस्थिती कठीण बनली आहे. या परिस्थितीला सर्वांनी मिळून तोंड देण्याची गरज आहे. आमच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत प्रभावीपणे राबविली, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात शेतकरी सन्मान योजना लागू करूनही शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबलेले नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या चार वर्षांत १२ हजार ०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर यंदा जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान ६१० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, अशी माहिती काल, शुक्रवारी विधानसभेत लेखी उत्तरातून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -